मुंबई : गेल्या जवळपास अडीच वर्षापासून कोरोनाने (Corona) जगाला हैराण करून सोडले आहे. कोरोनाची पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट अशा अनेक लाटा (Corona Third Wave) जगाने पाहिल्या आहे. तिसऱ्या लाटेपेक्षा पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या वेदना अत्यंत भयंकर आहेत. कित्येक दिवस लोकांना लॉकाडाऊनमुळे (lockdown) घरात बसून राहवं लागलं आहे. आपले अनेक दिवस कोणत्या ना कोणत्या निर्बंधात गेले आहेत. मात्र तिसऱ्या लाटेवेळी राबवलेल्या कडक नियमावलीमुळे आता कुठे तिसरी लाट कमी होताना दिसतेय. कोरोना अजून संपलेला नाही. मास्क कधी काढणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातो. मास्क काढण्याबाबतचे आताच काही सांगता येत नाही. आता आपल्याला हा जो काळ मिळाला तो लसीकरण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे लसीकरणावर भर द्या, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. मात्र शिवसैनिकांकडूनच कोरोना नियमांना हारताळ फासण्यात आली आहे. त्यमुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचा शिवसैनिकांनाच विसर पडलाय का, असा सवाल आता विचारला जातोय.
नियम फक्त सामान्य जनतेला?
युवासेना सचिव @SardesaiVarun जी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी राजभाषा दिनाचे औचित्यसाधून विलेपार्लेतील शालेय व महाविदयालयीन विद्यार्थ्यांना युवासेना विलेपार्ले तर्फे #विनामूल्य #पावनखिंड #चित्रपट दाखवण्यात आला @AmolGKirtikar @pravinpatkar2 @AmeyGhole@ShivSena @RupeshKadam03 pic.twitter.com/30WRZHjvZz
— Siddhesh Pawar (@SiddheshCPawar5) February 27, 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला युवासेनेकडून केराची टोपली दाखवल्याचे चित्र आज दिसून आलंय. युवासेनेचे नेते वरून सरदेसाई यांच्याकडून कोविड नियमांच खुलेआम उल्लंघन झालं आहे. संपूर्ण राज्यात कोविडमुळे नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेनं सुरू आहेत. मात्र युवासेनेच्या वरून सरदेसाई यांच्यासाठी नियम डावलून खचाखच चित्रपटगृह भरल्याचे दिसून आले. पार्ल्यात युवासेना आयोजित कार्यक्रमात एकूण क्षमतेपेक्षा दुप्पटीनं सिनेमागृह भरलं गेलं होतं. त्यामुळे नेत्यांनीच नियम डावलल्याने नियम फक्त सर्वसामान्य जनतेसाठी आहेत का, असा सवाल आता लोकांकडून विचारण्यात येत आहे.
मागणी करूनही क्षमता वाढवली नाही
गेल्या दोन-अडच वर्षात सारख्या लागणाऱ्या लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांचं कंबरडं मोडलं आहे. एकीकडे वारंवार मागणी करूनही नाट्यगृह चित्रपटगृहांची क्षमता 50 टक्याांवरच ठेवली गेलीय. तर दुसरीकडे युवासेनेसाठी नियमांना केराची टोपली असल्याचे पाहायला मिळालं आहे. त्यामुळे सहाजिक सामान्य जनतेकडून शिवसेनेला आणि सरकारला आता सवाल विचारण्यात येत आहे. सर्वसामान्यांनी कोरोना निय मोडल्यावर त्यांच्याकडून दंड आकारण्यात येतो, मात्र आता ये नेत्यांवर कारवाई होणार का? असा सवाल जनता विचारत आहे.