MLA Disqualification Result | सर्वात मोठी अपडेट, या तीन पैकी एक निकाल लागणार

| Updated on: Jan 10, 2024 | 4:46 PM

MLA Disqualification Result | आमदार अपात्रतेच्या निकालाकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलेलं आहे. हा निकाल लागायला अवघे काही मिनिटं बाकी आहेत. त्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे की, खालीलपैकी दिलेल्या तीन निकालांपैकी एक निकाल हा निश्चितच लागणार आहे.

MLA Disqualification Result | सर्वात मोठी अपडेट, या तीन पैकी एक निकाल लागणार
MLA Disqualification Result | Rahul Narvekar Uddhav Thackeray Eknath Shinde
Follow us on

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाला (MLA Disqualification Result) अवघी काही मिनिटे बाकी आहेत. या निकालाकडे फक्त राज्याचंच नाहीतर देशांचं लक्ष लागलेलं असणार आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यामधील कोणाची विकेट पडणार आज समजणार आहे. आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जो निकाल देतील तो खाली दिलेल्या तीन पैकी एक असणार आहे. ते तीन निकाल नेमके कोणते असणार आहेत. जाणून घ्या.

आज नेमके कोणते 3 निकाल लागू शकतात?

राहुल नार्वेकर शिंदेच्या बाजूने निकाल देऊ शकतात. जर हा निकाल शिंदे यांच्या बाजूने लागला तर उद्धव ठाकरे यांच्या हातातून पक्ष आणि पक्षचिन्ह जाणार आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना नवीन पक्ष स्थापन करावा लागण्याची शक्यता आहे.

निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागला तर शिंदेसह त्यांचे आमदार अपात्र ठरणार आहेत. शिंदेनाही नवीन पक्षाची स्थापना करावी लागू शकते. मात्र सगळ्यात मोठा फटका म्हणजे शिंदे गटातील आमदारांच्या राजकीय कारकिर्दीवर मोठा परिणाम होणार आहे.

तिसरं म्हणजे आज आमदार अपात्रतेच्या निकालावर निर्णयच घेणार नाहीत. राजकीय पक्ष कोण हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, असंही नार्वेकर सांगू शकतात. निकाल लागेपर्यंत दोन्ही गटातील आमदारांमध्ये धाकधूक होत असणार आहे.

दरम्यान, राहुल नार्वेकर जो काही निकाल देतील तो राष्ट्रवादी काँग्रेसलाही लागू होऊ शकतो. त्यामुळे फक्त शिवसेनेच्याच नाहीतर राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये धुसफुस असणार आहे आज हा फैसला कोणाच्या बाजूने लागणार शिंदे की ठाकरे काही मिनिटांमध्ये समजणार आहे. निकाल देण्याआधी विधानभवनाआधी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.  या निकालाआधी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी खळबळजनक दावा केला होता.

काय म्हणाले वैभव नाईक?

मला मंत्रालयामध्ये शिंदे आणि अजित पवार गटाचे आमदार भेटले होते. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही अपात्र होणार म्हणजे ठाकरे गटाचे आमदार हे अपात्र होणार आहेत, असं वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.  या दाव्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आरोप फेटाळून लावला आहे. ठाकरे यांचे आमदार अपात्र होतील म्हणून ते खोटे आरोप करत असल्याचं शिरसाट म्हणाले.