मुंबईः राज्याच्या राजकारणात आजचा दिवस मोठ्या घटना घडामोडींचा घडला आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे तर दुसरीकडे त्यांनी आमदार पदाचा राजीनामाही दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. राजीनामा नाट्यवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
त्यावरुनच सुषमा अंधारे यांनी राम कदम यांच्या निशाणा साधला आहे. त्यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये युवकांना म्हणाले होते की, हे राम कदम तेच आहेत जे म्हणाले होते की, कोणती पोरगी आवडते ते सांगा, मी उचलून आणतो. या वाक्यावर भाजप का शांत बसले होते.
तेव्हा राम कदम यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा का दाखल झाला नाही असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यामुळे राम कदम यांचा या वादाचा मुद्दा पुन्हा उफाळून येणार असल्याचे दिसत आहे…
ज्या जाहीर कार्यक्रमामध्ये राम कदम यांनी तुम्हाला आवडेल ती मुलगी सांगा मी उचलून आणतो असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भाजपने त्यांना प्रवक्ता केले. त्यावरुन सुषमा अंधारे म्हणाल्या की, तेव्हा भाजपला लाज कशी वाटली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
राम कदम यांच्यावर त्यांनी निशाणा साधला, कारण जितेंद्र आव्हाड यांनी कोणताही गुन्हा केला नसताना फक्त गर्दीच्या ठिकाणांवरूव महिलेला बाजूला करताना त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असल्याच्या कारणावरुनच त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी लगेच राम कदम यांचे प्रकरण आता उचलून धरले आहे. त्यामुळे भाजप आता यावर काय भूमिका घेणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.