BREAKING : ठाकरे गटाचा शिंदे गटावर नेमका आक्षेप काय? मोठी बातमी आली समोर

| Updated on: Jan 17, 2023 | 6:56 PM

शिवसेनेचं (Shiv Sena) नाव आणि चिन्ह हे कोणत्या गटाचं यावरुन केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर आलीय.

BREAKING : ठाकरे गटाचा शिंदे गटावर नेमका आक्षेप काय? मोठी बातमी आली समोर
Follow us on

मुंबई : शिवसेनेचं (Shiv Sena) नाव आणि चिन्ह हे कोणत्या गटाचं यावरुन केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. ठाकरे गटाने शिंदे गटाच्या कागदपत्रांवर आक्षेप घेतलाय. शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचा दावा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीत केला. विशेष म्हणजे या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचा शिंदे गटाच्या नेमक्या कोणत्या कागदपत्रांवर आक्षेप आहे, याबाबतची मोठी माहिती समोर आलीय. शिंदे गटाच्या 7 जिल्हाप्रमुखांच्या नावावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. शिंदे गटाने या सात जिल्हाप्रमुखांना जी पदं कागदपत्रांमध्ये सांगितली आहेत त्यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतलाय. तसेच ठाकरे गटाकडून याबाबत महत्त्वाचे कागदपत्रे आज निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले आहेत.

ठाकरे गटाकडून विजय चौगुले, किससिंग वसावे, राम रघुवंशी, रायगडचे तालुका प्रमुख राजाभाई केणी यांच्यासह आणखी तीन नावांवर आक्षेप घेण्यात आला. या नावांमध्ये त्रुटी असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे.

ठाकरे गटाने पुरावे सादर केले

शिंदे गटाने विजय चौगुले यांचा उल्लेख केलाय. पण ते मुख्य शिवसेनेत होते तेव्हा माजी विरोधी पक्षनेते असं पद त्यांच्याकडे होतं. पण ज्यावेळी त्यांची नियुक्ती झाली तेव्हा त्यांची ठाण्याचे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. या संदर्भाचे दोन्ही पुरावे निवडणूक आयोगात सादर करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

ठाकरे गटाचा समर्थन पत्रांवर आक्षेप

विजय चौगुले, किससिंग वसावे, राम रघुवंशी, रायगडचे तालुका प्रमुख राजाभाई केणी यांच्या समर्थन पत्रांवर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. चारही नेत्यांनी समर्थन पत्रांवर नमूद केलेल्या पदांवर ठाकरे गटाने आक्षेप घेतलाय.

याशिवाय शिंदे गटाकडून जे पुरावे दाखल करण्यात आले आहेत ते बोगस आहेत, असाही आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. केंद्रीय निवडणूक आयोग ठाकरे गटाच्या या आक्षेपावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

पुढची सुनावणी 20 जानेवारीला

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगात आज शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हं कुणाचं? या मुद्द्यावरुन महत्त्वाची सुनावणी पार पडली. ही सुनावणी जवळपास दीड तास चालली. या दीड तासात दोन्ही गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला.

निवडणूक आयोगातील आजची सुनावणी ही फार महत्त्वाची मानली जात होती. कारण केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत अंतिम निकाल देईल, असा अंदाज बांधला जात होता. पण ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आपल्याला आणखी अडीच तास युक्तिवादासाठी देण्यात यावेत, अशी विनंती केली. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने ही सुनावणी तीन दिवस पुढे ढकलली.

आता केंद्रीय निवडणूक आयोगात येत्या 20 जानेवारीला शुक्रवारी या प्रकरणावर सुनावणी होईल. या सुनावणीवेळी ठाकरे गटाच्या वकिलांकडून नेमकी काय भूमिका मांडण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.