नरेंद्र मोदी केवळ एक मुखवटा, देशाला एक शक्ती बरबाद करतेय; राहुल गांधी यांचा हल्लाबोल

| Updated on: Mar 17, 2024 | 9:07 PM

आम्हाला का करावी लागली. कारण देशातील संवादाचं जे माध्यम आहे, मग मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, आज देशाच्या हातात नाही. जनतेचे मुद्दे आहेत, बेरोजगारी, हिंसा द्वेष, महागाई, शेतकऱ्यांचे मुद्दे, जवानांचे मुद्दे, अग्निवीरचे मुद्दे हे मुद्दे तुम्हाला मीडियात दिसणार नाहीत. त्यामुळे आम्हाला ही यात्रा करावी लागल्याचं राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

नरेंद्र मोदी केवळ एक मुखवटा, देशाला एक शक्ती बरबाद करतेय; राहुल गांधी यांचा हल्लाबोल
Follow us on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ मास्क आहे. मुखवटा आहे. बॉलिवूडचे अॅक्टर्स आहे त्यांना रोल दिला जातो. आज हे बोलायचं, उद्या ते बोलायचं. सकाळी समुद्राखाली जा, सी प्लेनमधून उडा. 56 इंचाची छाती नाही. खोकला व्यक्ती आहे. एक तरुण माझ्याजवळ आला. सेक्युरिटीने त्याला हकललं, मारलं. तरीही तो आला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, मी तीन वर्ष व्यायाम केला. माझ्या मनात देशभक्ती होती. लडाखमध्ये जाऊन थंडीत जाऊन मी देशाच्या शत्रू विरोधात लढू. त्यांची गोळी खाईन हा विचार मी केला होता. पण आता अग्नवीर लागू केलं. माझ्या देशाने मला धोका दिला. नाही, देशाने किंवा सैन्याने धोका दिला नाही. तुम्हाला त्या शक्तीने धोका दिल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

धारावी जाऊन पाहा, मला विचारलं गेलं. ही यात्रा कुठून कुठे होणार? मणिपूरहून सुरू होणार  कारण तिथे या शक्तीने यादवी युद्धाचं वातावरण तयार केलं आहे. भाऊ भावाला गोळ्या घालत आहे. म्हणून तिथून सुरुवात केली. तसेच देशाला नवीन व्हिजन द्यायचं असेल तर यात्रा धारावीत संपली पाहिजे. कौशल्याचं कॅपिटल म्हणजे धारावी आहे. टॅलंट आहे. हिच शक्ती या धारावीकरांना घरातून हुसकावून लावत आहे. एकसाथ येऊन ही शक्ती या लोकांचं आयुष्य बरबाद करत असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं.

कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आम्ही यात्रा केली. यात्रा करावी लागली. 2004 मध्ये, 2010 मध्ये 2014 मध्ये मला चार हजार किलोमीटर कन्याकुमारीहून काश्मीरपर्यंत जावं लागेल, असा मी विचार केलाच नसता. ही यात्रा आम्हाला का करावी लागली. कारण देशातील संवादाचं जे माध्यम आहे, मग मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, आज देशाच्या हातात नाही. जनतेचे मुद्दे आहेत, बेरोजगारी, हिंसा द्वेष, महागाई, शेतकऱ्यांचे मुद्दे, जवानांचे मुद्दे, अग्निवीरचे मुद्दे हे मुद्दे तुम्हाला मीडियात दिसणार नाहीत. त्यामुळे आम्हाला ही यात्रा करावी लागली, कारण काहीच पर्याय नव्हता, असं राहुल गांधींनी सांगितलं.

देशातील तरुणांनी ही गोष्ट समजून घ्यावी. काहींना वाटतं एका व्यक्तीच्या विरोधात आम्ही लढत आहोत. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढत आहोत. नाही. आम्ही भाजपच्या विरोधात लढत नाही. एका व्यक्तीच्या विरोधात लढत नाही. एका व्यक्तीला चेहरा बनवून बसवलं आहे. हिंदू धर्मात शक्ती शब्द असतो. आम्ही शक्तीच्या विरोधात लढत आहोत. एका शक्तीच्या विरोधात लढत आहोत. आता ती शक्ती काय आहे हा सवाल आहे. कुणी तरी म्हणालं, राजाची आत्मा ईव्हीएममध्ये आहे. बरोबर आहे. राजाची आत्मा ईव्हीएममध्ये आहे. भारताच्या प्रत्येक संस्थेत आहे. ईडीत, आयटी, सीबीआयमध्ये असल्याचं राहुल गांधी म्हणाले.