मुंबई : मुंबईत शिवसेना नगरसेवकाच्या मुलाने (Shivsena Corporator Son Commit Suicide) आत्महत्या केली आहे. शिवसेना नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांच्या मुलाने पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. अभिषेक श्रीकांत शेट्ये असं या 25 वर्षीय नगरसेवक पुत्राचं नाव आहे. रविवारी (14 रात्री) 9 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली (Shivsena Corporator Son Commit Suicide).
श्रीकांत शेट्ये हे चेंबूर येथील सुमन नगर परिसरातील प्रभाग 155 चे नगरसेवक आहेत. त्यांचा मुलगा अभिषेक याने घरातील पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.
चेंबूर येथील सुमन नगर परिसरातील इमारतीत अभिषेक शेट्ये राहायचा. रविवारी तो आणि त्याचा भाऊ वेगळ्या खोलीत झोपला होता. त्याचा भाऊ उठून बाहेरच्या हॉलमध्ये गेला. त्यानंतर त्याने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.
बराच वेळ होऊन देखील तो उठला नसल्याने त्याचा भाऊ अभिषेकला खोलीत बघायला गेला. तेव्हा तो त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर त्याला तात्काळ मंगल आनंद येथील सुश्रुत रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी अभिषेकला मृत घोषित केलं. अभिषेकने मृत्यू का केला, याचा तपास सध्या पोलीस घेत आहेत (Shivsena Corporator Son Commit Suicide).
Sushant Singh Rajput suicide | अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याhttps://t.co/Ok5p75YPit
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 14, 2020
संबंधित बातम्या :
Sushant Singh Rajput | अब शहर भर जिक्र मेरी खुदकुशी का.. संजय राऊत-उद्धव ठाकरेही हळहळले
बुलडाण्यात वयोवृद्ध दाम्पत्याचा जळून मृत्यू, घातपात की आत्महत्या?
तुझं वागणं बरोबर नाही, चारित्र्यावरुन संशय, पती, सासू, दिराकडून विवाहितेचं मुंडन