मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल डी. वाय. पाटील विद्यापीठाने त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांनी डी. लिट पदवी बहाल केली आहे. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. एकनाथ शिंदे यांना डी. लिट पदवी मिळाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी कधी शस्त्रक्रिया केली होती असा खोचक सवाल त्यांनी केला होता. त्यावर आता शिवसेनेच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. शिवसेनेचे नेते किरण पावसकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी. लिट पदवी मिळाल्यानंतर ठाकरे गटाकडून अनेक सवाल उपस्थित केले होते. तर एकनाथ शिंदे यांनी डी. लिट पदवी मिळाल्यानंतर ही पदवी मिळण्याआधीच मी शस्त्रक्रिया केल्या आहेत असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला होता.
त्यावर संजय राऊत यांनी त्यांनी कधी शस्त्रक्रिया केली होती असा सवाल उपस्थित केला होता. आणि त्यांच्यावर टीकाही केली होती.
त्यावर किरण पावसकर यांनी संजय राऊत स्वतःला नेते आणि महाविकास आघाडीचे प्रवक्ते समजत असले तरी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्यांना जनतेनेचे डिलिट केले आहे असा टोला त्यांनी संजय राऊत आणि ठाकरे गटाला लगावला आहे.
तर एकनाथ शिंदे यांचे समर्थन करताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यातच शिवसेनेवर शस्त्रक्रिया केल्याची टीका त्यांनी केली आहे.
तर किरण पावसकर यांनी महाविकास आघाडीवर शिंदे यांच्याकडून राजकीय अस्त्रक्रिया केल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे यांच्यावर ज्यांनी ज्यांनी टीका केली आहे, त्यांना आता मतदारांनीच डिलिट करून टाकले आहे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.