मुंबई: भांडूप इथ एका मॉल मध्ये जिथ आता कोव्हिड सेंटर उभारलं होतं तिकडे एक दुर्दैवी प्रकार घडला आणि त्या ठिकाणी आग लागली. अनेक लोक मृत्युमुखी पडली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिकडे पाहणी करायला गेले. त्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील गेले. परंतु तिकडे जाऊन मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करणं. आगीची पाहणी करणं किंवा त्याची चौकशीची मागणी करणं हे आम्ही समजू शकतो. परंतु तिकडे जाऊन देखील महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेले राजकीय विषय हे देखील ते बोलायचे विसरले नाहीत. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता गेल्यामुळे हे इतके विचलित झाले आहेत की मृतांच्या टाळूवरचे लोणी खायला देखील ते विसरत नाहीत, अशी टीका शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी केली आहे. आता महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टी खरा चेहरा ओळखलेला आहे, असंही त्या म्हणाल्या. (Shivsena leader Manisha Kayande slams Devendra Fadnavis)
गृह विभागाचा जो अहवाल आहे त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. प्रश्न असा उपस्थित होतो की जी प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा पूर्वीच्या सरकारमध्ये होती, तीच यंत्रणा आता देखील आहे .सरकार बदलले तरी यंत्रणा तीच राहते म्हणजे हे सर्व अधिकारी जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा हे सगळे चांगले होते. आता याच अधिकारी आणि पोलिसांवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही, ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. सिताराम कुंटे यांच्या सारखे एक मराठी आयएएस अधिकारी यांची प्रतिमा अतिशय स्वच्छ आहे. अशा अधिकार्यांवर देखील ते आता अविश्वास दाखवत आहेत आणि त्यांची बदनामी करत आहेत हे अतिशय घृणास्पद आहे, असं मनीषा कायंदे म्हणाल्या.
गृह विभागाचा अहवाल जो एक प्रसिद्ध झाला त्याबद्दल तपास निश्चितच होईल. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्याबद्दल सविस्तर बाजू मांडली आहे. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी जो कबुलीजबाब दिलेला आहे तो देखील सगळ्यांनी ऐकलेला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोण राजकारण करत आहे आणि कशा पद्धतीने अधिकाऱ्यांना बळी पाडले जात आहे. त्यांना हाताशी धरुन राजकारण केले जात आहे. हे आता महाराष्ट्राची जनता पाहत आहे, असं मनीषा कायंदेंनी स्पष्ट केलं.
मनसुख हिरेन याच्या तोंडामध्ये जे रुमाल कोंबले होते ते आता गायब झाले आहेत, असे सांगण्यात येत आहे. हा तपास एटीएस करत होती आणि आता तपास एनआयएकडे सोपवला आहे. त्यामुळे सत्य लवकरच बाहेर यावं असं आम्हाला देखील वाटतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी जे कोणी दोषी असतील त्यांची गय केली जाणार नाही आणि कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असं पहिल्याचं दिवशी सांगितल्याचं मनीषा कायंदे म्हणाल्या.
Weather Alert | राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा फटका, आंबा उत्पादनाला फटका बसण्याची शक्यताhttps://t.co/ygl6dOKTmu#WeatherAlert | #Ratnagiri | #Sindudurga | #mango
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 26, 2021
संबंधित बातम्या:
रश्मी शुक्लांचा दबाव झुगारला; कोण आहेत राजेंद्र पाटील-यड्रावकर?
(Shivsena leader Manisha Kayande slams Devendra Fadnavis)