लोकसभा निवडणूक संपल्यापासूनच राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा होत आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक हिंट दिली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारावर त्यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य केलंय. मंत्रिमंडळाच्या फॉरम्युल्यावर चर्चा झाली नाही. आज किंवा उद्या याबाबतची घोषणा होईल अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री एकनाथ यांनी याबाबत गुप्तता पाळली आहे, असं संजय शिरसाट म्हणाले. मुंबईत टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा कधी होणार हे पाहणं महत्वाचं असेल.
अडीज वर्ष तुम्ही काय गोट्या खेळत होता का? तुम्ही आपल्या पोलीसांवर अविश्वास दाखवून ड्रग्ज माफियांना प्रोत्साहन देत आहेत. यातून पैसा आणि सत्ता हे बोलणं योग्य नाही. जे यावर टीका करतात ते मुर्खाच्या नंदनवनात आहेत. संजय राऊत यांना आता आठवलं वाटतं… मुख्यमंत्री घटनाबाह्य आहेत की नाहीत हे ठरवणारा तू कोण? तू जज आहेस का? यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, असं म्हणत संजय शिरसाटांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
देशात लोकशाही आहे. पैश्याचे सत्ता आली असती अंबानी- अदानी पंतप्रधान झाले असते. कल्पना लढवून, भाषा वापरून टिका करून काही होत नाही. सकाळचा भोंगा यालाच बांबू लावला पाहिजे. भोंगा वाढला की 10 वाजले असं समजतं. तुमचं तुम्ही वाकून पाहा. तुम्हाला शरद पवारांनी बांबू घातला. काँग्रेस म्हणतात की तुम्ही याच बांबू घालू… तुमच्यात किती बांबू लागले ते पाहा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुमच्या सल्ल्याची गरज नाही… बांबू ठाकरे गटाला लागलाय…, असं म्हणत संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
विधानसभेत आम्हीच यांना बांबू लावू… कमरेखालचं बोलायची संजय राऊत याला सवय लागली आहे. आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना आगीत तेल टाकण्याचं काम नाना पटोले करत आहेत. मी हात जोडून विनंती करत दोन्ही समाजांच्या नेत्यांना की सरकार आरक्षणा प्रश्ना गंभीर आहे. दोन समाजात तणाव वाढतोय. आपण याची दखल घेतली पाहिजे. अन्यथा राज्य पेटलं तर भयंकर प्रकार होईल, असं म्हणत संजय शिरसाट यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.