मुंबई: मुंबईच्या साकीनाका पोलीस स्टेशनची (Sakinaka Police) इमारत धोकादायक आणि जर्जर अवस्थेत आहे. या पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या पोलिसांमध्ये भीतीचे वातावरण असल्याची माहिती शिवसेना आमदार दिलीप मामा लांडे (Dilipmama Lande) यांनी सांगितलं आहे. साकीनाका इमारतीला पीडब्ल्यूडीकडून (PWD) दोन वर्षापूर्वी धोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आली आहे.या इमारतीमध्ये राहणारे सर्व कुटुंबीयाने स्थलांतरित देखील करण्यात आला आहे. मात्र, पोलीस स्टेशनचं काम येथूनचं सुरु आहे.
साकीनाका पोलीस स्टेशन मध्ये काम करणारे कर्मचारी त्याच धोकादायक इमारती मध्ये दिवस आणि रात्र काम करत आहेत. प्रत्येक वर्षी पावसामध्ये साकीनाका पोलीस स्टेशन मध्ये पाणी भरून तलावाचे स्वरूप घेतो आणि या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात कागदपत्रांचं सुद्धा नुकसान होतं.
स्थानिक शिवसेना आमदार दिलीप मामा लांडे यांनी गेल्या दोन वर्षापासून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,गृहमंत्री,राज्य गृहमंत्री यांना पाठपुरावा सुरु ठेवलाय. मात्र, शासनाकडून अजून याकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिलीप मामा लांडे यांनी सांगितलं आहे. साकीनाका पोलीस स्टेशन मध्ये काम करणारे कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या इमारती मध्ये बसून काम करत आहेत. या इमारतीमध्ये कुठली जरी घटना घडली तर याच्या जबाबदार कोण असणार? साकीनाका पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांच्या जीवाला या इमारतीमध्ये काम करताना धोका असल्याचं देखील शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आलं आहे.
साकीनाका पोलीस स्टेशनच्या कार्यालयाची इमारत धोकादायक अवस्थेत आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी देखील साचत असल्यानं कागदपत्रांचं नुकसान होतं. या इमारतीमधील रहिवाशांना इतरत्र स्थलांतरित करण्यात आलं आहे. मात्र, पोलीस स्टेशन त्याच ठिकाणी सुरु असल्यानं पावसाळ्याच्या दिवसात पोलिसांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं शिवसेना आमदार दिलीपमामा लांडे साकीनाका पोलीस स्टेशनचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी प्रयत्न करत आहेत.
इतर बातम्या:
Shivsena MLA Dilipmama Lande said Sakinaka Police station building is dangerous situation