तपास यंत्रणांना घाबरून पक्षातून पळून जाणाऱ्यांनाही हा मोठा धडा; उद्धव ठाकरे असं का म्हणाले?

| Updated on: Nov 10, 2022 | 2:34 PM

कर नाही त्याला डर कशाला, जी लोकं घाबरून पक्षातून पळून गेली आहेत. त्यांना संजय राऊत हा त्यांच्यासाठी मोठा धडा असल्याचेही त्यांनी सांगितले.

तपास यंत्रणांना घाबरून पक्षातून पळून जाणाऱ्यांनाही हा मोठा धडा; उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
Follow us on

मुंबईः उद्धव गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची तब्बल शंभर दिवसानंतर सुटका झाल्यानंतर संजय राऊत दुसऱ्या दिवशी माध्यमांसमोर आले. शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या धाडसाचे कौतूक करत शिंदे गटात गेलेल्या आमदारांना त्यांनी टोलाही लगावला. खासदार संजय राऊत यांचे कौतूक करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या धाडसाचे कौतूक करत म्हणाले की, तपा यंत्रणांना घाबरून पक्षातून जे सोडून गेले आहेत. त्यांच्यासाठी संजय राऊत म्हणजे मोठा धडा असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या अटक आणि जामिनावर बोलताना म्हणाले की, न्यायदेवतेवर भाष्य करणे हा गुन्हा आहे.

मात्र केंद्रीय मंत्री न्याय देवतेवर भाष्य करत आहे. त्यावर गुन्हा दाखल होणरा की नाही याची दखल न्याय देवता घेईलच असंही त्यांनी मत व्यक्त केले.

केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून अनेक पक्ष फोडले गेले आहेत. आणि त्याबरोबरच अनेक पक्ष फोडण्याचाही जोरदार प्रयत्न केला जात आहे.

अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांना बेकायदेशीरपणे अटक केली जात आहे. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. त्यातच संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले असून त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, न्यायालयाने केंद्राला कालच दणका दिला आहे.

कदाचित कुठल्या तरी खोट्या केसेसमध्ये परत संजय राऊत यांना गोवण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

एवढ्या चपराकीनंतर लाज वाटण्यासारखं हे केंद्र सरकार असतं तर अशा घटना घडल्या नसत्या असा टोलाही त्यांनी केंद्राला लगावला आहे.

केंद्र सरकारवर टीका करताना त्यांनी संजय राऊत आणि आपल्या मैत्रीचं आणि कौटुंबीक नात्याचाही उलघडा केला. या प्रकरणावर मला संजयला बरंच बोलायचं आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कर नाही त्याला डर कशाला, जी लोकं घाबरून पक्षातून पळून गेली आहेत. त्यांना संजय राऊत हा त्यांच्यासाठी मोठा धडा असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी निर्णयाबाबत बोलताना सांगितले की, न्यायालय निष्पक्षपातीपणे निर्णय देत आहे आणि ही चांगली गोष्ट असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.