Samana | इकडे शेतकरी उद्ध्वस्त, तिकडे सरकार भांग ढोसून पडले, सामनाच्या अग्रलेखातून सणकून टीका

| Updated on: Mar 09, 2023 | 9:51 AM

विरोधकांनी हा मुद्दा अधिवेशनात उचलून धरला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या काळातील चक्रिवादळाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावरून शिवसेनेनं स्पष्टीकरण देत मोदी सरकारवरच निशाणा साधला.

Samana | इकडे शेतकरी उद्ध्वस्त, तिकडे सरकार भांग ढोसून पडले, सामनाच्या अग्रलेखातून सणकून टीका
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई : देशात धुलिवंदन (Dhulivandan) उत्साहात साजरं झालं. मात्र रया उत्सवाची भांग सत्ताधाऱ्यांना जरा अतीच चढली होती. भांग पिऊन नाचण्यासाठी खास दिल्लीतून (Delhi) निमंत्रित होलावले होते. जुहूच्या पंचतारांकित हॉटेलात जलसा सुरु होता. त्याच वेळी राज्यातला शेतकरी अवकाळी आणि गारपीटीनं उध्वस्त होत होता. महाराष्ट्रातलं हे चित्र अत्यंत विदारक होतं. इकडे आमदारांना खोके द्यायला पैसे आहेत, मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत, अशी टीका शिवसेनेने (Shivsena) भाजप आणि शिंदे सरकारवर केली आहे. होळी आणि धुळवडीच्या दिवशी महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसाने बहुतांश शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्याचवेळी सरकारचे आमदार, मंत्री धुळवड साजरी करत होते, यावरून सामना वृत्तपत्रातून सणकून टीका करण्यात आली आहे.

जुहूत सरकारचा जलसा

संपूर्ण देशात धुलिवंदन साजरे झाले. मात्र महाराष्ट्रात या उत्साहाची भांग सत्ताधाऱ्यांना जरा जास्त चढली होती. भांग पिऊवन नाचण्यासाठी खास दिल्लीहून निमंत्रित आले होते. धुलिवंदनाचा जलसा जुहूच्या पंचतारांकित हॉटेलात सुरु होता. त्याच वेळी महाराष्ट्राचा शेतकरी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने उध्वस्त होत होता, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

तेव्हा मोदींचे सरकार भुजंगासारखे बसले..

विरोधकांनी हा मुद्दा अधिवेशनात उचलून धरला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या काळातील चक्रिवादळाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावरून शिवसेनेनं स्पष्टीकरण देत मोदी सरकारवरच निशाणा साधला. राज्याला जेव्हा चक्रिवादळाचा तडाखा बसला, त्याचे पंचनामे सुरु झाले तेव्हा कोरोना काळ होता. त्यावेळी महाराष्ट्राच्या तिजोरीवर मोदींचे सरकार भुजंगासारखे बसून राहिले होते. चक्रिवादळाच्या नुकसानीच्या पाहणीसाठी मोदी, शहा गुजरातेत पोहोचले. पण त्यांनी महाराष्ट्राकडे पाठ फिरवली. गुजरातसाठी १५०० कोटी दिले, पण महाराष्ट्राला ठेंगा दाखवला. त्याच ठेंगेवाल्यांनी महाराष्ट्राचे सरकारच खोके मोजून पाडले… असा आरोप सामनातून करण्यात आलाय.

महाराष्ट्रावर अवकाळी सरकार

अवकाळी पावसावरून शिवसेनेने सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्राच्या डोक्यावर जसे अवकाळी सरकार आले, तसे अवकाळी पावसाचे संकट राज्यावर कोसळले आमि त्याने हजारो हेक्टर शीतीतील उभे पीक आडवे केले. मुख्यमंत्र्यांना पाठीराख्या चाळीस आमदारांचीच चिंता आहे. बाकीची जनता त्यांना महत्त्वाची वाटत नाही. विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शुद्धीत आहे. सरकार मात्र भांग ढोसून पडले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, अशी व्यथा सामनातून मांडण्यात आली आहे.