श्वानप्रेमी आपल्या पाळीव प्राण्यांसाठी काहीही करायला तयार असतात. त्यांना विशेष वाटावे यासाठी ते कोणतीही कसर सोडत नाही. अगदी त्यांचा वाढदिवस, पार्टी, लग्न अशा गोष्टींचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावर यापूर्वी अनेक वेळा पाहिले असतील. या गोष्टी सध्या ट्रेंडमध्ये आहेत. असे व्हिडिओ सध्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पण, मुंबईतील एक महिला या सगळ्यांच्या चार पावले पुढे गेली आहे. या महिलेने आपल्या पाळीव कुत्र्याला लाखो रुपयांची अनमोल वस्तू भेट देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
या घटनेचा व्हिडिओ सध्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. ज्यामध्ये एक महिला तिच्या गोंडस पाळीव कुत्र्याला खास फील करताना दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला एक महिला अतिशय विचारपूर्वक सोन्याची चेन घेताना दिसत आहे. तिचा पाळीव कुत्रा तिच्याकडे अतिशय काळजीपूर्वक पहात आहे. यानंतर ती महिला सर्वांना आश्चर्यचकित करून तिच्या पाळीव कुत्र्याला लाखो रुपयांची अनमोल वस्तू भेट देताना दिसत आहे.
सरिता सलदान्हा असे या महिलेचे नाव आहे. या महिलेने तिच्या पाळीव कुत्र्याला एक सोन्याची साखळी भेट दिली आहे. ही सोन्याची साखळी तब्बल अडीच लाख रुपयांची आहे. हा व्हिडीओ मुंबईचा असल्याचे म्हटले जात आहे. त्या महिलेचा हा व्हिडिओ चेंबूर येथील अनिल ज्वेलर्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
अनिल ज्वेलर्सचे मालक पीयूष जैन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, चेंबूर भागातील रहिवासी असलेल्या सलदान्हा यांनी गेल्या महिन्यात तिच्या पाळीव कुत्र्याच्या वाढदिवशी सोन्याची चेन खरेदी केली होती. 35 ग्रॅम सोन्याच्या या साखळीची किंमत 2.5 लाखांहून अधिक आहे. हा व्हिडिओ पाहणाऱ्या एका यूजरने लिहिले की, ‘कुत्र्यावरील तुमचे प्रेम अप्रतिम आहे.’ दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘हा कुत्रा खूप भाग्यवान आहे.’ तिसऱ्या यूजरने लिहिले की, ‘असे लोक क्वचितच पाहायला मिळतात.’ तर एका यूजरने म्हटलं आहे की, ‘याला शो ऑफ म्हणावं की प्रेम.’