मुंबई : उन्हाळा सुरू झालेला आहे. अशा वेळी काही प्राणी (Animals) आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसू शकतात. विशेषत: जे प्राणी आपल्यापासून दूर असतात असे. यात जंगली प्राण्यांचा समावेश होतो. धोकादायक असे हे प्राणी असून माणसाने अशांपासून दूरच राहायला हवे. अलिकडेच वाघाचा (Tiger) डरकाळी फोडत नागरी वस्तीत आणि रस्त्यावर मुक्तसंचार करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याच्यासमोर जर कोणी आले असते, तर त्याला अक्षरश: फाडून खाल्ले असते. साप (Snake) हा देखील धोकादायक (Dangerous) प्राणी आहे. आपल्या अत्यंत जवळ असणारा असा हा धोकादायक प्राणी आणि त्यासंबंधीचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral) झाला आहे. दोन सापांमधला अत्यंत दुर्मीळ असा हा क्षण आहे.
वडाळ्यातील आदिनाथ सोसायटीमधील हा व्हिडिओ आहे. या सोसायटीमध्ये नाग व नागीण प्रणयप्रसंगात मग्न असलेला दुर्मीळ असा हा व्हिडिओ असून तो सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन नागांची जोडी आपल्याला दिसत आहे. काही अंतर ठेवून हा व्हिडिओ काढण्यात आला आहे. सापांच्या जवळ जाणे नेहमीच धोकादायक आणि जीवघेणे असते. त्यातही अशा प्रणयप्रसंगात बाधा आणली तर साप अत्यंत आक्रमक होतात.
#Mumbai : नाग व नागीण प्रणयप्रसंगात मग्न असलेला दुर्मीळ व्हिडिओ व्हायरल झालाय. वडाळ्यातल्या आदिनाथ सोसायटीमधील हा व्हिडिओ आहे. #snakes #Romance #wild #VideoViral #SocialMedia
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmGZMLmk pic.twitter.com/GlPQfnWu6M— TV9 Marathi (@TV9Marathi) March 28, 2022
विषारी साप असतील तर काही वेळातच माणसाचा मृत्यू होतो. तर बिनविषारी असला तरीही रुग्णालयात त्वरीत उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे अशा कोणत्याही धोकादायक प्राण्यांपासून दूर राहणेच आपल्यासाठी योग्य आहे.