मुंबई : मुंबईतील (Mumbai) रस्त्यांच्या कंत्राटावर काल आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली. विशिष्ट कंत्राटदारांना काम दिल्याचाही आरोप त्यांनी केला. शिवाय लोकप्रतिनिधी नसताना टेंडर कसे निघाले, असे विविध प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारले. त्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar ) म्हणाले, कोस्टल रोडवर मार्केट रेटच्या बरोबर रेट आणले. १२ टक्के जास्त झालं. त्यावेळी तुम्हाला हे कळलं नाही. त्याठिकाणी दर्जेदार काम व्हावं म्हणून निर्णय घेतला आहे. सगळ्यात चांगल्या एजंसीला काम दिलं. देशात सर्वोत्कृष्ट काम त्यांनी केलेली आहेत.अशाच लोकांची स्पर्धा होती. बराच वेळ ही स्पर्धा चालली. तेथे कोणीही सहभागी होऊ शकत होतं.
ही कामं होऊन मुंबई खड्डेमुक्त झाली तर आमचं काय होणार. मुंबईत चांगले दवाखाने होत आहेत. ते झाले तर आमचं काय होणार. मुंबईत चांगले सौदर्यीकरण होत आहे. मुंबईतील जीवन बदलत आहे, तर आमचं काय होणार. हा विचार तुम्हाला पिळतोय. म्हणून तुमची ही आदळ आपट चालली आहे. असा टोला आदित्य ठाकरे यांना लगावला.
ठाकरे गटाने ग्रामपंचायतीपासून धसका घेतला आहे. ग्रामपंचायतीमध्ये ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. पहिल्या क्रमांकावर भाजप आली. दुसऱ्या क्रमांकावर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि नंतर उद्धव ठाकरे (उबाठा) यांनी शिवसेना होती. उबाठा सेना होती.
वेगवेगळ्या ठिकाणी सोयरिक शोधले जात आहेत. अनेक लोकांशी सोयरिक करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. ते चिंतेत आले असतील. त्यामुळं यांना घाई झाली असेल. निवडणुका लवकर घ्या, असं त्यांना वाटत असेल, असंही दीपक केसरकर यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात. तेव्हा मुंबईची जनता त्यांच्या स्वागतासाठी सज्ज असते. मोठं-मोठे प्रकल्पांचे मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. हा मुंबईकरांचा कार्यक्रम आहे. मोठ्या प्रमाणात मुंबईकर येतील. लोकांना दिलासा देणारा हा कार्यक्रम आहे. अनेक मोठ्या प्रकल्पांची उद्धाटनं, भूमिपूजनं होणार आहेत. अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.
काहीही केलं तरी आम्ही ते ठरविलं होतं. पण, आम्ही ते करू शकलो नाही. ४-५ महिन्यात कोणी काही करत असेल, तर त्यामागे मेहनत असते. ती मेहनत कोणीतरी करते. याबद्दल कोणीही पोटदुखी करून घेऊ नये, असंही दीपक केसरकर यांनी म्हंटलं.