मुंबईः शहरातील विकास कामांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Urban Development Minister Eknath Shinde) यांनी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. विकास कामांनी केलेल्या काही मागण्यांचा थेट परिणाम राज्याच्या महसुलावर होणार असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना (Establishment of a special committee) करण्याचा निर्णयही एकनाथ शिंदे यांच्याकडून घेण्यात आहे. नवी मुंबईतील विकासकामांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने नगरविकास विभागाने सकारात्मक पावले टाकली आहेत.
नवी मुंबई क्षेत्रातील विकासकांचे महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी न.वि. विभागाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून विकासकांच्या काही मागण्यांचा थेट परिणाम राज्याच्या महसुलावर होणार असल्याने त्यावरील उपाय ही समिती महिन्याभरात शासनाला सुचवणार आहे.#NaviMumbaiHousingRevivalProgram pic.twitter.com/SEAIhH8LAN
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 16, 2022
नवी मुंबईतील (Navi Mumbai) बांधकाम व्यावसायिकांनी सांगितलेल्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिंदे यांनी पुढाकार घेतला असून 22.5 टक्के योजनेतील त्रिपक्षीय करारनामा करताना भरायची सुविधा शुल्क चार समान हफ्त्यात देण्याला परवानगी, बांधकाम मुदतवाढीच्या ना-हरकत दाखल्यासाठी एकाच वेळी 3 वर्षांपर्यंत मुदतवाढ देणे, सिडकोच्या मोठ्या भूखंडांवरील बांधकामासाठी अतिरिक्त 4 वर्षांचा कालावधी वाढवून देणे, कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन 2019 ला पर्यावरण विभागाची लवकरात लवकर मंजुरी मिळवून देणे, सीआरझेड प्रमाणपत्रामुळे रखडलेल्या प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र मिळवून देणे असे अनेक दिलासा देणारे निर्णय घेतले गेले आहेत. मात्र याशिवाय काही मागण्या या थेट सिडकोच्या महसुलावर थेट परिणाम करणाऱ्या असल्याने अशा पाच मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी आता समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई तील बांधकाम व्यवसायिकांना दिलासा देण्यासाठी नगरविकास विभागाने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असून या निर्णयांमुळे नवी मुंबईतील @CIDCO_Ltd सिडको क्षेत्रात काम करणाऱ्या विकासकांना वर्षानुवर्षे भेडसावणारे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होणार आहे. #NaviMumbaiHousingRevivalProgram pic.twitter.com/tbbIZTsPHm
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 16, 2022
यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, नवी मुंबईतील विकासकामांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने नगरविकास विभागाने सकारात्मक पावले टाकली आहेत, तरीही काही मुद्दे हे थेट सिडकोच्या महसुलावर परिणाम करणारे असल्याने याबाबत येत्या महिन्याभरात समितीचा निष्कर्ष समोर आल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
प्रकल्पग्रस्त भू-धारकाला मिळालेल्या वाढीव नुकसान भरपाईच्या अनुषंगाने साडेबारा टक्के योजनेअंतर्गत वाटप केलेल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात येणारी मावेजा रक्कम आणि त्याअनुषंगाने बांधकाम मुदतवाढीसाठी वाढणारे अतिरिक्त भाडेपट्टा शुल्क कमी करावे, अतिरिक्त भाडेपट्टा शुल्क आकारणीसाठी 115 टक्केपर्यंतचा दर कमी करावा, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला वास्तुविशारदाने प्रमाणित केल्यानंतर कोणतेही अतिरिक्त भाडेपट्टा शुल्क विकासकाकडून आकारण्यात येऊ नये, तारण ना हरकत दाखला (मॉरगेज एनओसी) देण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क कमी करावे, विकसनशील नोड्समध्ये आवश्यक पायाभूत सुविधा पूर्ण होण्यास उशीर होत असल्यामुळे भोगवटा प्रमाणपत्र मिळण्यास उशीर होतो.
त्यामुळे होणाऱ्या विलंबाबाबत अतिरिक्त भाडेपट्टा शुल्कामध्ये सवलत द्यावी या पाचही बाबींवर दिलासा देणारा निर्णय घेतल्यास त्याचा सिडकोच्या महसूलावर परिणाम होणार असल्याने या विषयाचा अभ्यास करून त्याबाबत निर्णय घेण्यासाठी शासनाने समिती नेमण्याचे निश्चित केले आहे.
समितीच्या अहवालानुसार समोर येणाऱ्या तत्थांचा अभ्यास करूनच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे नगरविकासमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.