टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : निवडणूक तोंडावर असताना भाजपला बंडखोरांचं टेन्शन? पाहा Video

| Updated on: Apr 15, 2023 | 11:44 PM

निवडणूक तोंडावर असताना या राज्यात भाजपच्या विद्यमान आमदारांचं आऊटगोईंग सुरु झालंय., तिकीट न मिळाल्यामुळे अनेक आमदार नाराज होतायत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनं आता कर्नाटकात ४० जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय.

टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : निवडणूक तोंडावर असताना भाजपला बंडखोरांचं टेन्शन? पाहा Video
Follow us on

मुंबई : निवडणूक तोंडावर असताना कर्नाटक भाजपात विद्यमान आमदारांचं आऊटगोईंग सुरु झालंय., तिकीट न मिळाल्यामुळे अनेक आमदार नाराज होतायत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनं आता कर्नाटकात ४० जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय.

निवडणुकांआधी अनेक राज्यात नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. पण कर्नाटक भाजपच्या या परंपरेला अपवाद ठरताना दिसतंय. निवडणूक २५ दिवसांवर आली असताना भाजपमधून आऊटगोईंग सुरु झालंय.

पाहा व्हिडीओ- 

भाजप नेते आणि खुद्द कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर नाराज आहेत. त्यांचं तिकीट कापलं गेलंय. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदींचं तिकीट कापल्यामुळे ते भाजपतून काँग्रेसमध्ये गेले आहेत. एम पी कुमारस्वामींनी भाजपमधून जेडीएसमध्ये प्रवेश केलाय. तिकीट कापल्यामुळे आमदार नेहरु ओलेकरांनी भाजपचा राजीनामा दिलाय. तिकीटाच्या कारणावरुन आमदार आर शंकरांनी राजीनामा दिलाय. एस अंगारा नावाच्या आमदारांनाही तिकीट न मिळाल्यानं त्यांनी यापुढे भाजपचं काम करणार नाही म्हणत निवृत्तीची घोषणा केलीय. केएस ईश्वरप्पा हे सुद्धा तिकीट कापल्यामुळे नाराज आहेत.

बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनकेही तिकीट कापल्यानं नाराज आहेत. ते राष्ट्रवादीकडून उभे राहण्याची चर्चा आहे. त्यांच्या समर्थकांनी भाजपविरोधात आंदोलनही केलंय. सुकुमार शेट्टींचंही तिकीट कापल्यानं ते नाराज आहेत. भाजप नेते रघुपती भट यांचं तिकीट कापलं गेल्यानंतर त्यांना तर चक्क रडूही कोसळलं.

भाजपनं तब्बल 52 हून जागांवर नव्या चेहऱ्यांना उमेदवारी दिलीय. मात्र त्याचा परिणाम बंडखोरीतून दिसू लागलाय. पण खरे भाजप कार्यकर्ते कधीच पक्ष सोडणार नाहीत, असा विश्वास मुख्यमंत्री बोम्मईंना आहे. भाजपप्रमाणेच कर्नाटक काँग्रेसमध्येही धुसफूस सुरु झालीय, असं म्हणतात की कर्नाटक काँग्रेसमध्ये याआधी डीके शिवकुमार आणि सिद्धारामय्या असे दोन गट होते. मात्र मल्लिकार्जुन खरके काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर आता खरगे- डीकेशिवकुमार आणि सिद्धारामय्या असे तीन गट पडलेयत.

विशेष म्हणजे आदल्या दिवशी शरद पवारांनी मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींसोबत दिल्लीत बैठक घेतली. बैठकीत विरोधकांच्या एकजुटतेवर चर्चा झाली. पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीनं कर्नाटकात किमान 40 जागा स्वतंत्रपणे लढवण्याची घोषणाही करुन टाकली. आश्चर्य म्हणजे काही दिवसांपूर्वी आम्ही कर्नाटकात मोजक्या ४ ते ५ जागाच लढवू असं स्वतः शरद पवारांनी म्हटलं होतं.

आता राष्ट्रवादीचे ह्या ४० उमेदवारांनी जर मतं खाल्ली तर त्याचा फायदा काँग्रेसला होईल की मग भाजपला. हे निकालावेळीच कळणार आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीची विनंती मान्य करत घड्याळ चिन्हावर लढायला संमती दिलीय.राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर महाराष्ट्र वगळता इतर कुठेही राष्ट्रवादीला घड्याळ चिन्हावर लढता येणार नव्हतं. पण राष्ट्रवादीच्या विनंतीनंतर निवडणूक आयोगानं फक्त कर्नाटक निवडणुकीपुरता घड्या चिन्हावर लढण्याची परवानगी दिलीय.

कर्नाटकात १० तारखेला मतदान आणि १३ तारखेला निकाल लागणाराय. अँटीइन्कबन्सी, बंडखोरी आमदारांची नाराजी या तिहेरी संकटाला भाजपला तोंड द्यायचं आहे. बंडखोरीमुळे फटका बसू नये म्हणून सध्या भाजपकडून काही नाराजीरावांची मनधरणी सुरु असल्याचंही बोललं जातंय.