Special Report | हेमंत नगराळे पूर्णवेळ डीजीपी कधी होणार? 26/11 च्या मुंबई हल्ल्यावेळी काय करत होते?

| Updated on: Jan 08, 2021 | 10:25 AM

राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार काल आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांनी स्वीकारला. पुढच्या काही दिवसात तेच फूल टाईम डीजीपी असतील याचीही जोरदार चर्चा आहे.

Special Report | हेमंत नगराळे पूर्णवेळ डीजीपी कधी होणार? 26/11 च्या मुंबई हल्ल्यावेळी काय करत होते?
पोलिस महासंचालक हेमंत नगराळे
Follow us on

मुंबई: महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार काल आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांनी स्वीकारला. पुढच्या काही दिवसात तेच फूल टाईम डीजीपी असतील याचीही जोरदार चर्चा आहे. सध्या मंत्र्यांच्या व्यस्ततेमुळे सरकारनं त्याबाबत निर्णय घेतलेला नाही. पण नगराळे पूर्ण वेळ पोलीस महासंचालक झाले तर त्यांना सर्वोच्च पदावर दीड वर्षाचा कार्यकाळ मिळेल. (Additional charge of the Director General of Police to Hemant Nagarale)

26/11 च्या मुंबई हल्ल्या वेळी काय करत होते नगराळे?

ज्यादिवशी मुंबई अतिरेक्यांनी हल्ला केला त्यावेळेस हेमंत नगराळे हे दक्षिण मुंबईतल्या कुलाबा भागात त्यांच्या घरी होते. तिथून अतिरेक्यांनी टार्गेट केलेला लिओपोल्ड कॅफे काही मिनिटाच्या अंतरावर होता. फायरिंगचा आवाज सुरु झाला त्यावेळेस हेमंत नगराळे घरी डिनर करत होते. अंगात त्यांच्या टी शर्ट होतं. फायरिंगचा आवाज जसाही ऐकायला मिळाला तसे नगराळेंनी जेवण सोडलं आणि सर्व्हिस रिव्हॉलव्हर घेऊन ते कॅफेकडे गेले. ते पोहोचपर्यंत अतिरेकी लिओपोल्ड कॅफेतून निघून ताज हॉटेलमध्ये घुसले होते. नंतर नगराळेही ताजकडं गेले. हॉटेलमधून बाहेर पडणाऱ्यांना त्यांनी मदत केली. तसच मुंबई पोलीस आणि केंद्रीय संस्थांमध्ये त्यादिवशी त्यांनी समन्वय साधण्याचं कामही केलं. ताज हॉटेल्या बाहेर आरडीएक्सची बॅग होती, ती डिफ्यूज करण्यातही नगराळेंनी महत्वाची भूमिका वठवल्याची माहिती आहे.

गडचिरोली-नक्षलभागात दिर्घकाळ सेवा

हेमंत नगराळेंनी नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्यातही दिर्घकाळ सेवा केलेली आहे. त्यामुळे संवेदनशिल भागात काम करण्याचा त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. त्याचाच फायदा त्यांना मुंबई हल्ल्याच्या वेळी झाला. मुंबईवरचा हल्ला हा अंडरवर्ल्डचं शुटआऊट नसून मोठा अतिरेकी हल्ला असल्याची जाणीव त्यांना अनुभवातूनच झाली.

SIT मध्येही नगराळेंचं काम

महाराष्ट्रात गाजलेल्या तेलगी कांडाची चौकशी करण्यासाठी एक एसआयटी बनवलेली होती. त्यात प्रतिनियुक्तीवर गेलेले डीजीपी सुबोध जयस्वाल तर होतेच पण हेमंत नगराळेही होते. स्टाफ ऑफिसरची त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. विशेष म्हणजे त्या एसआयटीनं कॉन्सटेबलपासून ते डीजीपीपर्यंत अनेकांना अटक केलेली होती. नगराळेंनी सीबीआयमध्येही बऱ्याच काळ काम केलेलं आहे.

इतर बातम्या:

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुद्रांक शुल्कात कपात झाल्याने मुंबईतील घरं सहा लाखांनी स्वस्त होणार

Weather Alert | येत्या 24 तासात पावसाची शक्यता, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले

Additional charge of the post of Director General of Police to Hemant Nagarale