मुंबई : कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनमुळे विस्कटलेली आर्थिक घडी अशा परिस्थितीत कोणाला नोकरीवरुन काढू नका असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. मात्र एसटी महामंडळाने जवळपास 10 हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीने हा निर्णय घेतला. (ST suspends many workers service)
एसटी बंद असल्याने उत्पन्न रखडलं, त्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. कोरोना संकट टळल्यानंतर पुढील परिस्थिती पाहून या कर्मचाऱ्यांना पुन्हा ज्येष्ठतेनुसार सेवेत घेतलं जाणार आहे.
सरकार एकीकडे नोकरीवरुन काढू नका म्हणत असताना एसटीतून 10 हजार कर्मचाऱ्यांची सेवा खंडित केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. 2019 च्या भरतीमधली ही सेवा स्थगित करण्यात आली आहे.
जवळपास 8500 वाहक, चालकांसह इतर कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित करण्यात आली आहे. ज्यांचं प्रशिक्षण सुरु आहे, त्या कर्मचाऱ्यांचंही प्रशिक्षण थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातून याबाबतचं पत्रक विभागीय कार्यालयांना पाठवण्यात आलं आहे.
एसटीच्या पत्रकात काय म्हटलं आहे?
(ST suspends many workers service)
संबंधित बातम्या
Corona Care | एसटी बसमध्ये आता आसनव्यवस्थेचा ऑड-इव्हन फॉर्म्युला
Ratnagiri Corona | सोशल डिस्टन्सिंग पाळत रत्नागिरीत एसटी बससेवा सुरु