मुंबई : गेल्या अनेक महिन्यापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन (St Worker Strike) सुरू आहे. गुरूवारी कोर्टाने दिलेल्या मोठ्या निर्णयानंतरही एसटी कर्मचारी आक्रमक झाल्याचे दिसून आले. एसटी कर्मचाऱ्यांनी आज शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेर जोरदार आंदोलन केले आहे. यावेळी एसटी कर्मचारी हातात दगड घेऊन आणि चपला घेऊन दिसून आले. यावेळी शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना चोरांचे सम्राट म्हणत एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शरद पवार आमच्या विलीनीकरणाच्या आड आले. अशा प्रतिक्रिया एसटी कर्मचारी देत होते मात्र मध्येच एक महिला येते आणि प्रतिक्रिया देते की कुणाकुणाला अडवणार आहेत. आमचं वैर आहे सत्ताधाऱ्यांशी. आम्ही आज विधवा झालो आहोत. 120 जणांच्या नावानं मी चुडा फोडल्यात आज अजित पवार, शरद पवारांच्या दारात! आज माझा आक्रोश आहे त्यांच्याबद्दल. आज माझी १२० भगिनी विधवा झाली त्यांच्या घरी काय अवस्था आहे ओ… त्यांची लेकरं रडायला लागलीये… असा आक्रोश या महिलेचा यावेळी दिसून आला.
आज पाच महिने झाले आम्ही आझाद मैदाना बसलेलो आहोत. या निर्दयी सरकारला त्या कशाचीच जाणीव नाहीये. प्रत्येकवेळी या शरद पवारांच्या हातात कारभार असल्याप्रमाणे मनमानी कारभार चालू आहे..आमची एकही समस्या ऐकली गेली नाहीये. माझं कुटुंब रस्त्यावर आलं. आम्ही घरावर तुळशीपत्र ठेवून इथं आलेलो आहोत. आमचा काय छळ चाललाय, ते महाराष्ट्र पाहतोय. उपाशी आहोत. उपाशीपोटी आंदोलन करतोय. गालबोट लागावं असं कोणतंच वक्तव्य आजपर्यंत केलेलं नाही. पण आता आमच्या सहनशक्तीचा अंत पाहिला जातोय. एवढं झालं तरीही कुणीही आलेलं नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया ही महिला देताना दिसून आली.
हे आंदोलन आक्रमक झाल्यावर सुप्रिया सुळे आंदोलनकांशी बोलण्याच्या प्रयत्न करण्यासाठी उतरल्या. एसटी कर्मचाऱ्यांशी मी बोलायला तयार आहे. मी एसटी कर्मचाऱ्यांशी बोलायला तयार आहे. माझी एसटी कर्मचाऱ्यांना विनम्र विनंती आहे शांततेच चर्चा करायला तयार आहे. माझी आई माझे वडील आणि मुलगी घरात आहे. मला त्यांना भेटून येऊद्या मी बोलायला तयार आहे. शांतता राखा या माहोलमध्ये कशी चर्चा करणार, अशी विनंती आंदोलकांना सुप्रिया सुळे करताना दिसून आल्या.
St Worker : शरद पवारांच्या घराबाहेर जोरदार आंदोलन, एसटी कर्मचाऱ्यांचा पुन्हा एल्गार
Mahavitran : भारनियमन टाळण्यासाठी मोठा निर्णय, महावितरणाला वीज खरेदी करण्यास परवानगी