महायुती सरकारचा अंतरिम, अतिरिक्त अर्थसंकल्प थोड्याच वेळात सादर होईल. विधीमंडळात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे दुपारी राज्याचा 2024-25 चा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. लोकसभेचा अनुभव पाहता राज्य सरकार अर्थसंकल्पात घोषणांचा मोठा पाऊस पाडण्याची दाट शक्यता आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्या पोतडीत काय काय आहे, याची जनतेमध्ये मोठी उत्सुकता आहे.
जनतेला मिळेल शिंदे गॅरंटी
राज्यातील अर्थसंकल्प अजित पवार सादर करत आहेत. पण या बजेटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छाप असेल, अशी चर्चा आहे. देशात मोदी गॅरंटीप्रमाणे राज्यातील जनतेला शिंदे गॅरंटी देण्यात येईल. राज्यातील जनतेवर योजनांचा पाऊस पाडण्यात येईल. सर्वसामान्य जनतेला या बजेटमध्ये लॉटरी लागणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील अर्थ संकल्पात सर्वसामान्य जनतेसाठी विशेष योजनांचा विचार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काय असू शकते अर्थसंकल्पात
1) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना.
2) उद्देश – आर्थिक, सामाजिक स्थैर्य आणि जीवनमान सुधारण्यासाठी
3) लाभार्थी – २१ ते ६० वयोगटातील महिला
4) वार्षिक २,६०,००० प्रेक्षा कमी उत्पन्न असलेले पात्र ठरणार.
5) सुमारे – ३.५० कोटी हून अधीक महिलांना लाभ अपेक्षित
6) प्रत्येक लाभार्थ्यांना दरमहा – १६०० रुपये मिळणार
राज्यातील युवकांसाठी योजना
1) मुख्यमंत्री युवा कौशल्य योजना
2) १२ वी पास युवक पात्र
3) ६०००-७००० रुपये – वार्षिक
4) आयटीआय डिप्लोमा – ७०००-८००० रुपये
5) पदवीधर – ९०००-१०००० रुपये
6) १८ ते २९ वर्षे वयोगट दरम्यान अंदाज़े लाभार्थी ठरतील
या योजनांची होऊ शकते घोषणा
1) अन्नपूर्णा योजना : दरवर्षी ३ घरगुती गॅस सिलिंडर मोफत सर्व महिलांना पात्र
2) मुख्यंमंत्री बळीराजा वीज सवलत योजना
3) कृषी पंपांना विनामुल्य वीज : ७.५ एचपी मोटर्स आहे त्या सर्व छोट्या मध्यम शेतकऱ्यांना मोफत वीज देणार.
4) ४५ लाख हून अधीक शेतकऱ्यांना फायदा होईल.
5) ७ लाखाहून शेतकऱ्यांना सौर पंप देण्याचा विचार.
6) एकूण 50 लाखाहून अधिक शेतकरी लाभार्थी ठरतील.