मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची आज (20 जानेवारी) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षण, वाढीव वीजबिलासह इतर महत्त्वाचे निर्णयांवर चर्चा झाली. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि महाविकासआघाडीचे वरिष्ठ मंत्री उपस्थित होते. (State Cabinet Meeting In the presence of CM Uddhav Thackeray)
गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे अनेक राज्य मंत्रिमंडळ बैठकींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहत होते. मात्र यानंतर आज पहिल्यांदा प्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात
दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांची प्री-कॅबिनेट बैठक पार पडली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या बंगल्यावर बैठक झाल्याची माहिती आहे. या बैठकीला शिवसेनेचे नेते उपस्थित होते. कॅबिनेट बैठकीपूर्वी ही बैठक झाल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलली
राज्य सरकारनं मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून 12 टक्के आरक्षण दिलं होते. सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली होती. न्या. अशोक भूषण, न्या. नागेश्वर राव, न्या. अब्दुल नजीर, न्या. हेमंत गुप्ता, न्या. रवींद्र भट यांच्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणाची याचिका आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणप्रकरणी सुनावणीची तारीख 25 जानेवारी देण्यात आली होती. मात्र, आता 5 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. (State Cabinet Meeting In the presence of CM Uddhav Thackeray)
संबंधित बातम्या :
लोकांना अंधारात ढकलणाऱ्या सरकारला गाडून टाका, वीज बिल मुद्यावर मनसे आक्रमक
ठाकरे सरकारकडून सुरक्षाकपात, नारायण राणेंना आता थेट मोदी सरकारकडून CISF कवच