मुंबई : अनलॉकिंगदरम्यान सर्व काही सुरळीत होत असताना, मुंबई लोकल मात्र सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र राज्य सरकारने आता महिलांनाही मुंबई लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. सरकारने त्याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केलं आहे. महिलांना मुंबई लोकलमध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत तर संध्याकाळी 7 नंतर पुढे प्रवास करता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी क्यूआर कोडची आवश्यकता नाही. (State government allows women to travel by Mumbai local train)
कोरोनामुळे लॉकडाऊनदरम्यान मुंबई लोकल रेल्वे 22 मार्चपासून बंद होती. त्यानंतर अनलॉकिंग झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली. पण सर्वसामान्य नागरिकांना लोकलमध्ये प्रवेश मिळत नसल्याने, सर्वसामन्य मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवाय रस्त्यावर ट्रॅफिकमुळे मुंबईकरांचे अनेक तास हे प्रवासातच जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मनसेसह अनेकांनी मुंबई लोकल रेल्वे सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याची मागणी लावून धरली आहे.
दरम्यान, मुंबईसह एमएमआर रिजनमधील महिलांना उद्यापासून लोकलने प्रवास करता येणार आहे. तसेच महिलांना प्रवास करताना क्यू आर कोडची आवश्यकता नसेल. सकाळी 11 नंतर महिलांना रेल्वेने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे चाकरमानी महिलांना याचा फार फायदा होणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून विविध राजकीय पक्षांनी लोकल सुरु करण्याची मागणी केली होती. अखेर महिलांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
अनलॉकची प्रक्रिया सुरु केल्यानंतर अनेक गोष्टी सुरु केल्या. सुरुवातीला दुकाने, भाजी मार्केट, चिकण-मटण शॉप सुरु करण्यात आले. आजपासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरु करण्यात आले. हळूहळू सर्व गोष्टी सुरु केल्या जात आहेत. आता सिनेमागृहदेखील सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल मात्र अद्याप सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे सुरु करण्यात आलेली नाही.
संबंधित बातम्या
Breaking | मुंबई लोकलच्या प्रवाशांना दिलासा, राज्य सरकार लोकलच्या फेऱ्या वाढवणार
…तरच मुंबई लोकल सुरु करु : रेल्वेमंत्री पियुष गोयल
मुंबईत ग्रीड फेल्युअरमुळे बत्तीगुल, लाईट नसल्याने मुंबई लोकल ठप्प
(State government allows women to travel by Mumbai local train)