मुंबई : विविध परीक्षा, वेळापत्रक, निकाल यामुळे सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या मुंबई विद्यापीठाचा आणखी एक गोंधळ समोर आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या एलएलएम प्रवेश प्रक्रियेत गोंधळ झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. एलएलएम प्रवेश प्रक्रियेच्या अखेरच्या फेरीत राहिलेल्या रिक्त जागा लपवण्यात आल्या. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत गुण कमी मिळवले आहेत, त्यांना यात प्रवेश मिळाल्याचा विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. मात्र मुंबईत विद्यापीठाने हे आरोप फेटाळले आहेत. (Student Allegations on LLM admission process in Mumbai University)
मुंबई विद्यापीठात एलएलएम प्रवेश परीक्षा डिसेंबर 2020 मध्ये घेण्यात आली. गेल्या 5 महिन्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू असून येत्या 2 जूनला विद्यापीठ परीक्षा घेणार आहे. मागील आठवड्यात या परीक्षेची सहावी अंतिम फेरी घेण्यात आली. यामध्ये वेबसाईटवर सुरुवातीला रिक्त जागा कमी दाखवण्यात आल्या.
मात्र, ऑनलाईन व्हिडीओ कॉलद्वारे प्रत्यक्षात कॉऊन्सलिंग राऊंड सुरू झाला. तेव्हा वेबसाईटवर दाखवल्यापेक्षा अधिक जागा रिक्त असल्याचा निदर्शनात आला. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे.
यात प्रवेश न मिळालेल्या नवीन सैनी या विद्यार्थ्याला 76 टक्के गुण आहेत. तर रचना कर्णिक या विद्यार्थिनीला 82 टक्के गुण आहेत. दरम्यान आता प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे. तरीही अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशापासून वंचित आहे. येत्या 2 जूनला या एलएलएम अभ्यासक्रमाची परीक्षा आहे. त्यावेळी शेवटची फेरी परत घेऊन मेरिटनुसार रिक्त जागांवर प्रवेश मिळावा आणि एलएलएमची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी कुलगुरू, राज्यपाल यांच्याकडे केली आहे.
मात्र, विद्यार्थ्यांनी केलेल्या या आरोपाचा विद्यापीठकडून खंडन करण्यात आलं आहे. या प्रवेश प्रक्रियेत असा कोणताही गोंधळ झालेला नाही, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे. विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, शेवटच्या फेरीचे स्पॉट अडमिशन हे नियमानुसार झाले आहे. शिवाय ज्यांचे प्रवेश हे शेवटच्या फेरीत झाले आहेत. त्यांच्यासाठी वेगळी परीक्षा घेतली जाणार आहे. (Student Allegations on LLM admission process in Mumbai University)
संबंधित बातम्या :
मुंबई विद्यापीठात शिवसेना vs राज्यपाल संघर्ष तीव्र, कोश्यारींनी शिफारस केलेल्या कंपनीवरुन वाद
मुंबई विद्यापीठात गुरांचा वर्ग, कलिना कॅम्पसमधील टेनिस कोर्टात गुरं चरायला
मोठी बातमी : लस घेतलेल्यांना लोकल ट्रेननं प्रवास करण्याची परवानगी द्या : मनसे