मुंबई : तरूणीला इम्प्रेस करण्यासाठी एका तरूणाने कारच्या पुढच्या खिडकीतून लटकता प्रवास केल्याचा व्हीडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. मानखुर्द फ्लायओव्हरवरील या व्हीडीओमुळे या बेशिस्त तरूणासह इतर प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी वाहतूक पोलिसांकडे सोशल मिडीयावर होत आहे.
मानखुर्द फ्लायओव्हरवर छेडानगर येथे मंगळवारी रात्री एक तरूण कारच्या बाहेर लटकत बिनाधास्त स्टंटबाजी करताना ट्वीटर शेअर करण्यात आला आहे. या तरूणाने तरूणीसमोर शायनिंग मारण्यासाठी हा पराक्रम केल्याचे म्हटले जात आहे. ज्या व्यक्तीने हा व्हीडीओ शेअर केला आहे, त्याने असा दावा केला आहे की हा तरूण त्याच्या गर्लफ्रेंडला खूष करण्यासाठी अशा प्रकारे खिडीकीला लटकत स्टंटबाजी करीत आहे. या व्हीडीओला शेअर करताना मुंबई पोलीसांना टॅग करीत या तरूणावर कारवाई करण्याची मागणी इंटरनेटधारकांनी केली आहे.
Seeing girls in Olacab on the way frm Mankhurd flyover to Chheda Ngr,A boy is seen flirting during the journey at 7:30pm today.tht girl captured this incident on mobile.(1/2) @MumbaiPolice @DevenBhartiIPS @MTPHereToHelp @Dev_Fadnavis @mumbaimatterz @RoadsOfMumbai @TOIMumbai @ANI pic.twitter.com/3KSJDxjouq
— ??.ℝ?? ???? (@Rajmajiofficial) January 10, 2023
मुंबईतील मानखुर्द फ्लायओव्हरवरून छेडा नगरला जाताना एका ओला कॅबमधील मुलगी हा व्हीडिओ चित्रीत करताना दिसत आहे, मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजताची ही घटना असल्याचे म्हटले जात आहे. अशा बेफाम तरूणांना कायद्याचा धाक राहीला नसल्याने ते बिनधास्तपणे असे स्टंट करीत असल्याचे समाजमाध्यमावर या व्हीडीओला पाहून प्रतिक्रीया येत आहेत. दरम्यान, या तरूणाचा शोध घेतला जात असून मानखूर्द ट्रॅफीक डीव्हीजनला या तरूणावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे मुंबई पोलीसांनी या व्हीडीओला प्रतिक्रीया दिली आहे.