Subhash Desai on Raj Thackeray: दुपारी झोपायचं आणि रात्री सुपारी घ्यायची, ही तर सुपारी सभा; सुभाष देसाई यांची पहिल्यांदाच राज ठाकरेंवर टीका

| Updated on: May 01, 2022 | 5:52 PM

Subhash Desai on Raj Thackeray: आजची सभा ही सुपारी सभा आहे. भोंगा कमळाला किती त्रास देतो पाहावे लागेल.

Subhash Desai on Raj Thackeray: दुपारी झोपायचं आणि रात्री सुपारी घ्यायची, ही तर सुपारी सभा; सुभाष देसाई यांची पहिल्यांदाच राज ठाकरेंवर टीका
दुपारी झोपायचं आणि रात्री सुपारी घ्यायची, ही तर सुपारी सभा; सुभाष देसाई यांची पहिल्यांदाच राज ठाकरेंवर टीका
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेवर उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी टीका केली आहे. आज सुपारी सभा आहे. दुपारी झोपायचं आणि रात्री सुपारी घ्यायची हे सध्या सुरू आहे. कमळ आणि भोंग्याचं नातं जुनं आहे हे कमळाला कळेल? असा सवाल करतानाच सरडा रंग बदलतो, तसे यांचे विचार बदलतात. भगवी शाल अंगावर पांघरली म्हणजे कोणी बाळासाहेब होऊ शकत नाही. एकवेळा आवाज काढतील, नकला करतील. पण कोणीही शिवसेनाप्रमुख होऊच शकत नाही, असं सुभाष देसाई म्हणाले. तसेच मनसे (mns) सोडून अनेक गेले. मात्र त्यांच्याकडे आता कोणी येत नाही. गळक्या घरात कोणी येत नाही, अशी खोचक टीकाही सुभाष देसाई यांनी केली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे आजच्या सभेतून कुणावर निशाणा साधतात आणि कुणाची स्तुती करतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आजची सभा ही सुपारी सभा आहे. भोंगा कमळाला किती त्रास देतो पाहावे लागेल. आजच्या सभेनंतर राज्यातील वातावरण अजिबात खराब होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्याच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मा पत्कारलेल्या सर्वांना अभिवादन. शासन शेतकरी, कष्टकरी सर्वांच्या पाठीशी आहे. कोव्हिडची अजूनही काळजी घेणे गरजेचे आहे. शिवभोजन ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. औरंगाबादला 150 कंपन्यांना भूखंड वाटप करण्यात आले आहेत. उद्योगात जिल्हा नंबर एक वर आहे, अशी माहितीही सुभाष देसाई यांनी दिली.

दहा हजार कार्यकर्ते मैदानात

दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेला अवघे काही तास उरले आहेत. त्यापूर्वीच मैदानात दहा हजार कार्यकर्ते एकवटले आहेत. या सभेला मुंबई, ठाण्यासह राज्यातून हजारो लोक आले आहेत. खासकरून मराठवाड्यातील नांदेड, जालना, उस्मानाबादमधून सर्वाधिक लोक आले आहेत. मैदानात जमलेले कार्यकर्ते राज ठाकरे जिंदाबादच्या घोषणा देत आहेत. त्यामुळे हा संपूर्ण परिसर ढवळून निघाला आहे. अजूनही काही कार्यकर्ते मैदानाच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे ही सभा विक्रमी होणार असल्याचं चित्रं दिसत आहे.

हे सुद्धा वाचा