मुंबई : रिया चक्रवर्ती यांना ४४ कॉल आहे आहेत. ते एयू नावानं आहेत. ते आदित्य, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे असावेत, असा आरोप राहुल शेवाळे यांनी केला. त्यावर बोलताना .. म्हणाल्या, अशा प्रकारचा आरोप होणे साहजिक आहे. अधिवेशन सुरू झाल्यापासून दोन दिवसांत आदित्य ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सरकारची पोलखोल केली आहे. त्यामुळं आदित्य ठाकरे यांना नाहक आदित्य ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजना घाडी यांनी केलाय.
एयू लिहिलेला कॉल आदित्य उद्धव यांचा ठरविण्याचा अधिकार यांना कुणी दिला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हा व्हिडीओ गेली कित्तेक दिवस सोशल मीडियावर फिरतो. चॅनलवर येऊन गेलाय. रिंकी बंसला म्हणून बाई आहेत. कंटीन्यू व्हिडीओवर सांगतात. राहुल शेवाळे यांचे अतिशय घाणेरड्या शब्दातले त्यांचे व्हिडीओज आहेत, असं संजना घाडी म्हणाल्या.
ती महिला सांगते. यांनी मला एक्सफ्लाईट केलेलं आहे. अत्याचार केलेला आहे. ब्लॅकमेल केलेलं आहे. त्यामुळं मला, माझ्या कुटुंबीयांना धोका आहे. ती बाई लपून बसली आहे. काही जणांना भेटण्याचा प्रयत्न करत आहे. तीचं प्रकरण निकाली काढण्याचं राहुल शेवाळे यांना सूचत नाहीय, असा आरोपही त्यांनी लावला.
संजय राठोड यांचं प्रकरण समोर आलं. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी तातडीनं त्यांचा राजीनामा घेतला होता. भाजपनं राहुल शेवाळे यांना शिंदे गटाचे प्रमुख बनविलं आहे. काय प्रकार आहे हा. शाबाशकी बहाल करता तुम्ही, असा सवालही संजना घाडी यांनी विचारला.