मुंबई : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे महाराज नागपूरमध्ये पहिल्यांदा जास्त चर्चेत आले. बाबा धीरेंद्र स्वत:ला सनातनी धर्माचा प्रसारक मानतात. ते आपल्या शक्तीने अनेकांचे प्रश्न सोडवतात, ते तुमचे नातेवाईकांची नावं, भाऊ बहिणींची नावं सांगू शकतात, ते तुम्हाला होणारा त्रास देखील सांगू शकतात. हे मागील काही दिवसांपासून तुम्ही यूट्यूबवरील व्हिडीओंवरुन पाहत आहात. बाबा धीरेंद्र यांना अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी देखील आव्हान दिलं होतं. यानंतर बाबा धीरेंद्र यांनी हा कोणताही चमत्कार नसल्याचं स्पष्ट केलं. पण प्रश्न हा कायम होता बाबा धीरेंद्र यांच्याकडे अशी कोणती शक्ती आहे, जे हे सर्व ओळखू शकतात, याची सर्व उत्तर तुम्हाला सुहानी शाह हीने जी उत्तर दिली आहेत,त्यात नक्कीच स्पष्ट होतील.
तर सुहानी शाह ही तरुणी आहे मुंबईची. ती चांगली हिंदी आणि इंग्रजी बोलते, पण आश्चर्य़ाची गोष्ट ती फक्त पहिलीत गेलीय. सुहानी शाह हीची ओळख माईंड रिडर अशी आहे, तिला जादूगार असं ही म्हणतात, वयाच्या ७ व्या वर्षापासून ती हे शिकते आणि यावर देशभरात शो आयोजित करते.
माईंड रिडर हे क्षेत्र तिच्यासाठी सुरुवातीला खूपच चॅलेन्जिंग होतं, कारण एक मुलगी माईंड रिडर म्हणजे लोकांच्या मनात जादूगार होवून करणार तरी काय आहे, हे अनेक प्रश्न तिच्या आईवडिलांना विचारले जात होते.
सुहानी शाह तुमच्या मनात काय प्रश्न आहे, तुम्ही काय विचार करतात, हे ओळखते, सुहानी शहा यांनी अनेक टीव्ही चॅनेल्सवर बाबा धीरेंद्र चर्चेत आल्यानंतर माईंड रिडर हे सर्व करु शकतो, हे असं करणं, ओळखणं, म्हणजे दिव्य शक्ती किंवा चमत्कार नाही, हे आपल्या कलेतून स्पष्ट केलं आहे. माईंड रिडिंग ही एक कला आहे, अंधश्रद्धा नाही, मी लहानपणापासून अंधश्रद्धेच्या विरोधात असल्याचं सुहानी शाह या तरुणीने म्हटलं आहे.
सुहानी शाह मागील ३ दिवसांपासून जे काही करुन दाखवत आहे, त्यामुळे देशभरातील लोकांच्या मनात जो संशयकल्लोळ होता तो दूर होत चालला आहे. दरम्यान बाबा धीरेंद्र यांनी आपण कोणताही चमत्कार करत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. सुहानी शाह हीच्या माईंड रिडिंगच्या या कलेमुळे देशातील लोकांना आणखी एका विषयाची समज नक्कीच आली आहे.
सुहानी शाह म्हणते, लहानपणापासून माईंड रिडिंगचं मला पॅशन होतं, ते मी पूर्ण केलं, मी पहिलीची शिकली असली, तरी मी या कलेवर पुस्तकं लिहिली आहेत. कारण देशभर फिरत असताना अनेक लोकांशी भेटीगाठी आणि संवाद झाले यात भाषेचं ज्ञान मिळालं. मी माझी इंग्रजी अधिक सुधारण्यावर अजुनही भर देत आहे. भारतात सोशल मीडियावर बाबा धीरेंद्र नंतर सुहानी शाह चर्चेत आली आहे, तिच्या या कलेमुळे.