विद्यार्थ्यांच्या याचिकेची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल, आरे प्रकरणी आज सुनावणी

| Updated on: Oct 07, 2019 | 9:13 AM

मुंबईतील आरे कॉलोनीतील मेट्रो कारशेडसाठी झाडांची कत्तल केल्याचं प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे (Aarey case in HC). विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या पत्राचे याचिकेत रुपांतर करुन त्यावर सर्वोच्च न्यायालय आज (7 ऑक्टोबर)तातडीने सुनावणी घेण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या याचिकेची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल, आरे प्रकरणी आज सुनावणी
Follow us on

नवी दिल्ली : मुंबईतील आरे कॉलोनीतील मेट्रो कारशेडसाठी झाडांची कत्तल केल्याचं प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे (Aarey case in SC). विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या पत्राचे याचिकेत रुपांतर करुन त्यावर सर्वोच्च न्यायालय आज (7 ऑक्टोबर)तातडीने सुनावणी घेण्यात येणार आहे (Aarey case in SC). न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठापुढे आज सकाळी दहा वाजता ही सुनावणी होईल. रविवारी (6 ऑक्टोबर)विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी झाडं कापल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली (Aarey petition in SC).

सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांनी त्यांच्या विशेष अधिकारांचा वापर करत या प्रकरणी तातडीने सुनावणी घ्यायला हवी आणि झाडांना वाचवायला हवं (Aarey Tree Cutting), अशी याचिका दाखल करण्यात आली. विधि शाखेचा विद्यार्थी रीशव रंजन याने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पत्र पाठवले असून, त्याची एक प्रत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही पाठवण्यात आली आहे. बृहन्मुंबई महापालिकेसह मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाने सुरु केलेल्या आरेमधील वृक्षतोडीला स्थगिती देण्याची विनंती त्याने या पत्राद्वारे केली आहे.

4 ऑक्टोबरपासून अनधिकृतपणे झाडांची कत्तल सुरु आहे. शांततेत विरोध करणाऱ्यांना ताब्यात घेतलं जात आहे, त्यामुळे या याचिकेवर तातडीने सुनावणी व्हायला हवी, अशी विनंती विद्यार्थ्यांनी सीजेआयला लिहिलेल्या पत्रात केली.

आरेमध्ये ते सर्व आहे जे जंगलासाठी गरजेचं आहे. मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी झाडांना कापलं जात आहे, असं या साचिकेत सांगण्यात आलं. तसेच, अनेक ठिकाणी या आदेशाला आव्हानं दिली, कारशेडसाठी पर्यायी ठिकाणं सुचवली, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.

या कामासाठी प्रस्तावित मीठी नदीच्या तीरावरील आरेच्या 33 हेक्टर भूभागात 3,500 पेक्षा जास्त झाडं आहेत. यापैकी 2,238 झाडं कापण्याचा प्रस्ताव आहे. जर असं झालं तर मुंबईवर पुराचा धोका वाढेल, असंही या याचिकेत सांगण्यात आलं.

या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत सरन्यायाधीशांनी तातडीची सुनावणी घेण्याचे आदेश दिले. दसऱ्यानिमित्त सर्वोच्च न्यायालयाला 7 ते 13 ऑक्टोबरदरम्यान सुट्टी आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे नियमित कामकाज पुढील सोमवारी 14 ऑक्टोबर रोजी सुरू होईल आहे. मात्र, आरेतील वृक्षतोडीचा मुद्दा अत्यंत गांभीर असल्याने या सुनावणीसाठी सुट्टीकालीन विशेष पीठ नेमण्यात आले आहे.

मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी वृक्षतोड करण्याचे सर्व आक्षेप मुंबई उच्चन्यायालयाने शुक्रवारी (4 ऑक्टोबर)फेटाळून लावले. त्यानंतर त्याच रात्रीपासून आरेमध्ये वृक्षतोड करण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत आरेतील अनेक झाडं कापण्यात आली आहेत. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी काय निर्णय देणार, हे महत्त्वाचं ठरणार आहे.

VIDEO :