मुंबई : निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हं शिंदेंना देण्याचा निर्णय घेतला आणि सुप्रीम कोर्टानंही शिंदेंना दिलासा देत, आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिलाय. तर ठाकरे गटालाही एक दिलासा मिळालेला आहे. पाहुयात त्यावर स्पेशल रिपोर्ट
शिंदेंच्या शिवसेनेला सर्वात मोठा दिलासा ! शिवसेना, धनुष्यबाण मिळाल्याच्या निर्णयाला स्थगिती नाही! शिवसेना नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडेच!
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरुन सुप्रीम कोर्टातून शिंदेंना मोठा दिलासा मिळालाय. कारण निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली नाही. त्यामुळं शिवसेना, धनुष्यबाण चिन्हं एकनाथ शिदेंकडेच असेल सुप्रीम कोर्टातली सुनावणी पूर्ण होईपर्यंत मशाल चिन्हं ठाकरे गटाकडेच राहणार एकनाथ शिंदे आणि निवडणूक आयोगाला नोटीस म्हणणं मांडण्यास सांगण्यात आलंय. तसंच पुढील सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. तोपर्यंत ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावणार नाही, असं शिंदेंच्या शिवसेनेनं स्पष्ट केलंय.
ठाकरे गटकडून कपिल सिब्बल यांनी, निवडणूक आयोगाचा निर्णय कसा अयोग्य आहे, यावरुन युक्तिवाद केला. सिब्बल म्हणाले की, धनुष्यबाणाच्या पहिल्याच सुनावणीत सुप्रीम कोर्टाकडून दोघांनाही दिलासा मिळालाय. शिंदेंना पक्ष आणि चिन्हं मिळाल्याच्या निर्णयाला स्थगिती मिळाली नाही आणि किमान पुढचे 2 आठवडे तरी ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावून, अपात्रते संर्भातली कारवाई होणार नाही.
आता पुढची सुनावणी 2 आठवड्यानंतर आहे. त्यामुळं शिंदे आणि निवडणूक आयोगाकडून काय उत्तरं सादर केली जातात, त्यावर बरंच काही अवलंबून असेल.