सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर सडकून टीका, म्हणाल्या,… हे षडयंत्र कुठून होतं?

| Updated on: Dec 01, 2022 | 6:47 PM

स्वतःच्या राजकारणासाठी दिल्लीला खुश करण्यासाठी असं खोटं बोलू नये.

सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर सडकून टीका, म्हणाल्या,... हे षडयंत्र कुठून होतं?
सुप्रिया सुळे
Follow us on

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला केला. त्या म्हणाल्या, कर्नाटक सरकार सीमाप्रश्नी असं का करतंय. सीमाप्रश्नामागे अदृश्य शक्ती आहे. देशात होत नाहीत. अशा गोष्टी राज्यातचं का होतायत. महाराष्ट्र अस्थिर निर्माण करण्याचा एक षडयंत्र होतंय, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. ईडी सरकार आलं. तेव्हापासून रोज काहीना काही वाईट होतंय. रोजच महाराष्ट्राच्या विरोधात राज्याची बदनामी होईल, अशी वक्तव्य भाजपकडून केली जात आहेत. सत्तेतील लोकं महाराष्ट्राचं नुकसान करतात, असंही त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्र तोडण्याचं षडयंत्र कुठून होतं, याचं उत्तर सत्तेतील लोकांनी दिलं पाहिजे. त्यांच्याच विचाराचे मंत्री, मुख्यमंत्री बोलतात. भाजपकडून अशा गोष्टी होतात का, याची शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही.

महाराष्ट्र सरकार ईडी सरकार सत्ता ओरबडतात. गैरवापर करतात. कुठलं मोठं काम केलंय. हास्यास्पद आहे. सिनारमाज महाराष्ट्रात पहिल्यांदा आलं. अशा वल्गना करतात. सुनील तटकरे यांनी इंदापुरात याचं आधीचं उद् घाटन केलं आहे. भाजप, ईडी सरकारला विनंती करते. स्वतःच्या राजकारणासाठी दिल्लीला खुश करण्यासाठी असं खोटं बोलू नये.

खाल्या मिठाला जागा, ही म्हण यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितली. सरकारमध्ये सात वर्षे होता. अशावेळी वल्गना करणाऱ्या ईडी सरकारनी जबाबदारी घेतली पाहिजे. साडेतीन महिन्यात काय केलं हे सांगण्याची वेळ आली आहे, असं सुळे यांनी सांगितलं.

मंत्री लोढा यांनी दिलगिरी व्यक्त केली, असं ऐकलं. असं असेल तर हा विषय बाजूला ठेवू. बेरोजगारीवर चर्चा करणं गरजेचं असल्याचं त्या म्हणाल्या.