मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी (BMC To Fight Corona) सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. मुंबई मनपानेही कोरोनोविरुद्ध मोहिम सुरु केली आहे. तर पुण्यात पालिका कर्मचारी आजपासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. तसेच, कोरोना संबंधित माहिती (BMC To Fight Corona) आणि वैद्यकीय सल्ला देण्याचं काम हे पथक करणार आहे.
मुंबई मनपाने कोरोनाविरुद्ध एक मोहिम हाती घेतली आहे. महापलिकेने 1,067 पथकांची स्थापना केली आहे. हे पथकं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथल्या परिसरातील नागरिकांचं सर्वेक्षण करत आहेत. आतापर्यंत या पथकाने 10 हजार 27 सोसायट्यांना भेट दिली आहे. नागरिकांची तपासणी करुन त्यांच्याविषयीची माहिती गोळा केली जात आहे. यादरम्यान, आता पर्यंत 528 लोकांना अलिप्त राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
#RightKnowledge#FirstLineOfDefence#BeyondTwitter
Today, 1000+ teams from @mybmc were out in the field. They met members of 10000+ housing societies & sensitised them about simple preventive measures to combat Coronavirus. #NaToCorona https://t.co/vmzAIoJ4Kx pic.twitter.com/YIvfOkYLDG
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 15, 2020
हेही वाचा : Corona | पुण्यात संचारबंदीचा प्रस्ताव, तुळशीबाग तीन दिवस बंद
पुण्यात आजपासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण
पुण्यातही आजपासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. (BMC To Fight Corona) त्यासाठी पालिकेने 125 पथकं तयार केली असून एका पथकामध्ये 3 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
परदेशातून पुण्यात आलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये कोरोनाची माहिती आणि वैद्यकीय सल्ला देण्याचं कामही पथक करणार आहे.
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 33 वर
दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुण्यात आणखी एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 33 वर पोहोचली आहे. तर पुण्यात कोरोना रुग्णांची (Cerfew Praposal In Pune) संख्या (BMC To Fight Corona) 15 वरुन 16 झाली आहे.
संबंधित बातम्या :
Corona | देशभरात टीव्ही मालिका-चित्रपटांचं शूटिंग 31 मार्चपर्यंत बंद
कोरोनामुळे साखरपुड्यातच लग्न उरकलं, वाचलेले पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला
इटली-स्पेनमध्ये लॉकडाऊन, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर कोणत्या देशात काय खबरदारी?
11 रुपयांचे लॉकेट विकून फसवणूक, उत्तर प्रदेश पोलिसांकडून कोरोना बाबाला अटक