मुंबई : अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला अनेक वळणं येत आहेत. आधी सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली. आता सुशांतच्या बहिणीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना या प्रकरणात लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे (Sushant Singh sister appeal PM Modi). तसेच या प्रकरणातील पुराव्यांशी कोणतीही छेडछाड होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुशांत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.
सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंह किर्तीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींना आवाहन केलं आहे. तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे, “माझं मन मला सांगतंय की पंतप्रधान मोदी नेहमीच सत्यासोबत आणि सत्यासाठी उभे राहतात. आम्ही खूप सामान्य कुटुंबातून आलो आहोत. माझा भाऊ बॉलिवूडमध्ये होता तेव्हा त्याचा कुणीही गॉडफादर नव्हता. आमचाही आत्ता कुणी गॉडफादर नाही. तुम्ही तातडीने या प्रकरणात लक्ष घालावं अशी माझी विनंती आहे. तसेच या प्रकरणाचा तपास योग्यरितीने व्हावा, पुराव्यांशी कोणतीही छेडछाड होऊ नये याकडे लक्ष द्यावे. मला न्यायाची अपेक्षा आहे.”
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणी कोटक महिंद्रा बॅंकेने पोलिसांना पूर्ण सहकार्य करत असल्याची माहिती दिली आहे. कायदेशीर कोणतीही मदत पाहिजे असल्यास कोटक महिंद्रा बॅंक करेल, असंही बँकेने स्पष्ट केलं आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“उद्धव ठाकरे म्हणतात मुंबई पोलीस सक्षम, मात्र बिहार पोलिसांना गाडीत ढकलून स्पष्ट झालं…”
सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर भाजप नेते शाहनवाज हुसेन यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे म्हणतात मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात सक्षम आहेत. मात्र, मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना ज्याप्रकारे गाडीत ढकलले त्यावरुन मुंबई पोलीस सहकार्य करत नसल्याचं स्पष्ट होत आहे.”
सुशांत सिंह प्रकरणात ईडीने अभिनेत्री रिया आणि तिचे वडील इंद्रजीत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. याबाबत 3 जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती येत्या काही दिवसात ईडी कार्यालयात हजर होईल असंही सांगण्यात येत आहे. ईडीकडून रिया चक्रवर्तीची देखील चौकशी होऊ शकते. रिया चक्रवर्तीच्या बँक देवाणघेवाणीबाबत देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
बिहार पोलिसांना मुंबईत कोरोनाचा धोका?
बिहार पोलिसांचं पथक ज्या व्यक्तीच्या बीएमडब्ल्यू गाडीतून फिरत होते, त्याच्या आई वडिलांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संबंधित व्यक्तीची आई सध्या आयसीयूमध्ये दाखल आहे. गाडी मालकाला मात्र अद्याप कोणतीही लक्षणं नाहीत. तो डॉक्टरांच्या संपर्कात आहे.
मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना सुशांतचा शवविच्छेदन अहवाल (पोस्ट मार्टम रिपोर्ट) देण्यास नकार दिल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती दिली आहे. यानंतर बिहार पोलिसांनी मुंबईतील नोडल अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. तसेच तपासात सहकार्य करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मंगळवारी (3 जुलै) सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर रिया चक्रवर्ती माध्यमांशी बोलणार आहे.
बिहार पोलीस आज ‘दिल बेचारा’ या चित्रपटाच्या क्रु मेंबरची चौकशी करणार आहेत. सुशांतची मानसिक स्थिती चित्रपटात काम करताना कशी होती? याची माहिती घेतली जाणार आहे. ‘दिल बेचारा’ हा सुशांतचा शेवटचा चित्रपट होता.
हेही वाचा :
आदित्य ठाकरेंची मुंबई पोलीस आयुक्तांसोबत बैठक, अभिनेता अक्षय कुमारही उपस्थित
बिहार पोलीस कायद्याच्या कचाट्यात, मुंबई पोलिसांकडून नियम सांगत एसआयटीला समज
Sushant Singh sister appeal PM Modi