Tv9 स्पेशल रिपोर्ट | ‘सुषमा अंधारे आणि राखी सावंत दोघी बहीणी’, मोहीत कंबोज यांची जीभ घसरली!

| Updated on: Apr 06, 2023 | 11:41 PM

ठाण्यातल्या ठाकरे गटाच्या निषेध मोर्चातून सुषमा अंधारेंनी फडणवीसांसह बावनकुळेंवर जोरदार हल्ला केला आणि काही तासांतच भाजपच्या मोहीत कंबोज यांनी सुषमा अंधारेंची तुलना थेट राखी सावंतशी केली.

Tv9 स्पेशल रिपोर्ट | सुषमा अंधारे आणि राखी सावंत दोघी बहीणी, मोहीत कंबोज यांची जीभ घसरली!
Follow us on

मुंबई : भाजपच्या मोहीत कंबोज यांनी, सुषमा अंधारेंवर जोरदार टीका केलीय. सुषमा अंधारे आणि राखी सावंत या बहीणी असल्याचं कंबोज म्हणालेत. त्यानंतर कंबोज यांच्यावर महाविकास आघाडीची महिला ब्रिगेड तुटून पडली. पाहा टीव्ही9चा स्पेशल रिपोर्ट

ठाण्यातल्या ठाकरे गटाच्या निषेध मोर्चातून सुषमा अंधारेंनी फडणवीसांसह बावनकुळेंवर जोरदार हल्ला केला आणि काही तासांतच भाजपच्या मोहीत कंबोज यांनी सुषमा अंधारेंची तुलना थेट राखी सावंतशी केली. कंबोज यांनी सुषमा अंधारे आणि राखी सावंत दोघी बहीणी असल्याचं ट्विट केलंय.

सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोन्ही बहिणी आहेत. एक बहीण महाराष्ट्राच्या राजकारणात तर दुसरी बहीण महाराष्ट्राच्या सिनेमामध्ये. दोन्ही बहिणी एकमेकींशी स्पर्धा करत आहेत की रोज सगळ्यात जास्त सनसनाटी कोण निर्माण करेल.

काही दिवसांआधीच, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाटांनी अंधारेंवर टीका केली होती. त्यावरुन प्रकरण पोलीस स्टेशन ते मानहानीच्या दाव्यापर्यंत आलंय.आता कंबोज यांनी अंधारेंना राखी सावंतची बहीण म्हटलंय. सुषमा अंधारे आधी सामाजिक कार्यकर्त्या होत्या. आता त्या ठाकरे गटात आल्यात ठाकरे गटात येताच त्यांना उपनेत्या हे पद मिळालं तर राखी सावंत ही बॉलिवूडची आयटम गर्ल म्हणून ओळखली जातेलग्नासाठी स्वयंवरही आयोजित करुन लक्ष वेधून घेतलं होतं.

सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे बरेचदा ट्रोलही होते. मोहीत कंबोज यांनी सुषमा अंधारेंना अचानक का टार्गेट केलं. तर ठाण्यातलं अंधारेंचं भाषण आणि त्यातून फडणवीस, बावनकुळेंवरचा निशाणा. कंबोज यांच्या ट्विटवर अद्याप सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिलेली नाही पण ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांनी मात्र सडकून टीका केलीय.