Rupali Thombare : रुपाली ठोंबरे पक्षात नाराज? सुषमा अंधारे यांचे ते ट्वीट आले एकदम चर्चेत

| Updated on: Jun 13, 2024 | 10:09 AM

Sushma Andhare on Rupali Thombare : लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला शंभर हत्तींचे बळ मिळाले आहे. तर महायुती धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच आता राजकारणात भूकंप आणि हादरे बसण्याचे दावे महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.

Rupali Thombare : रुपाली ठोंबरे पक्षात नाराज? सुषमा अंधारे यांचे ते ट्वीट आले एकदम चर्चेत
सुषमा अंधारे यांच्या ट्वीटने खळबळ
Follow us on

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात जोरदार मुसंडी मारली. महायुतीचे पार पानीपत झाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने भोपळा फोडला. पण त्यांना कोकणातील एकाच जागेवर समाधान मानावे लागले. त्यातच आता महाविकास आघाडी राज्यातील राजकारणात मोठ्या भूंकपाचे संकेत देत आहे. या भूंकपाचे हादरे महायुतीला बसणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. सुषमा अंधारे यांच्या एका ट्वीटमुळे याविषयीची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.

थोरल्या पवारांकडे धाव

हे सुद्धा वाचा

अजित पवार गटाला राज्यात एकच जागेवर समाधान मानावे लागले. थोरल्या पवारांनी त्यांचा करिष्मा दाखवला. त्यामुळे अनेकजण अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार गोटात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शरद पवार गटातील अनेक नेते सुद्धा अजित पवार गटातील अनेक जण संपर्कात असल्याचा दावा करत आहेत. काही जणांना पक्षात योग्य संधी मिळत नसल्याने ते नाराज आहेत, ते लवकरच पक्षाला रामराम ठोकतील असे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर चित्र बदलणार असल्याचा विश्वास महाविकास आघाडीला आहे.

काय केले ट्वीट

“निष्कलंक चारित्र्य, उत्तम जनसंपर्क, निडरता, रोखठोक, नेत्यांच्या मागेपुढे करून नाही तर लोकांमध्ये मिसळून काम करणारी लढाऊ कार्यकर्ता.. तरीही अजून किती दिवस उपेक्षित राहणार? रूपालीताई, अजून किती मुस्कटदाबी सहन करणार? निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ…” असे ट्वीट सुषमा अंधारे यांनी केले आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे ट्वीट सध्या चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांची पक्षात मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप अंधारे यांनी केला. त्यांच्या या ट्वीटने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अर्थात अजून रुपाली ठोंबरे यांची यावर प्रतिक्रिया यायची आहे. ती आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल.

राज्यातील राजकारणात भूकंप?

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप येण्याचा दावा करण्यात येत आहे. गेलेले अनेक नेते, पदाधिकारी परतीच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर जनभावना कुणाच्या बाजूने हे चित्र स्पष्ट झाले. महायुतीतील नाराजी नाट्याचा महाविकास आघाडीला फायदा होईल, असा दावा नेते करत आहे. तर महायुतीने कमबॅकसाठी कंबर कसली आहे. दोन्ही बाजूने विधानसभा सरशी करण्याचा दावा करण्यात येत आहे. पण या काळात किती बुरुज ढासळतील, किती नेते पक्ष बदलतील हे समोर येईल.