मुंबई: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा पदाधिकाऱ्यांची सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर पोस्टरबाजी करत त्याला प्रश्न विचारला आहे. आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? असा सवाल या पोस्टरच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत (Farmers Protest) पॉपस्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी केलेल्या टिप्पणीला सचिन तेंडुलकरनं ट्विटद्वारे उत्तर दिलं होते. त्यानंतर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असणाऱ्यांनी सचिन तेंडुलकरनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यापूर्वी भूमिका का घेतली नाही असा सवाल उपस्थित केला होता. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील सचिनला सल्ला दिला होता. (Swabhimani Shetkari Sanghtana youth wing asked question to Sachin Tendulkar by Poster at his house)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावरून ट्विट केल्यानंतर त्यावरून उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काही संघटनांनी तर सचिनला दिलेला भारतरत्न पुरस्कार काढून घेण्याची मागणी केली आहे. सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या ट्विटनंतर विविध शेतकरी संघटनांनी आपला रोष व्यक्त केला आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा पदाधिकाऱ्यांनी आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्वीट करशील? असा सवाल या पोस्टरच्या माध्यमातून सचिन तेंडुलकरला विचारला आहे.
शरद पवार म्हणाले, “सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावर काही भूमिका घेतली असली, तरी सामान्य लोकांमध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली आहे. त्यांनी वेगळ्या क्षेत्राबद्दल बोलायचं असेल तेव्हा काळजी घेतली पाहिजे, हा माझा सचिनला सल्ला आहे.”
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत (Farmers Protest) पॉपस्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी केलेल्या टिप्पणीला भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं ट्विट द्वारे (Sachin Tendulkar) प्रत्युत्तर दिलं होतं.भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात, पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये. भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं आणि ती गोष्ट त्यांनीच ठरवावी. देश हा एकसंध राहिला पाहिजे, असे ट्विट सचिन तेंडुलकर याने केले आहे.
‘या’ आयटी कंपनीचं कर्मचार्यांना गिफ्ट; 10 दिवसांच्या पगाराइतका थेट बोनस#HCLTechnologies #SpecialBonushttps://t.co/UEvKmGfo9i
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 8, 2021
संबंधित बातम्या:
सचिनला माझा ‘हा’ सल्ला, शेतकरी आंदोलानावरुन शरद पवारांनी सचिनचे कान टोचले
सचिनने कधी नाही ते शेतकरी आंदोलनावर ट्विट करून चूक केली? पवारांसह अनेकजण का नाराज
(Swabhimani Shetkari Sanghtana youth wing asked question to Sachin Tendulkar by Poster at his house)