मुंबईः हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत भाषण करताना छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख त्यांनी स्वराज्यरक्षक केला होता. त्यानंतर सत्ताधाऱ्यांसह अजित पवार यांच्या विरोधकांनी राज्यभर जोरदार आंदोलन केले होते. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होतेच मात्र ते खरे धर्मवीर होते अशी टीका त्यांनी अजित पवार यांच्यावर केली होती. तर त्यानंतर आज सत्ताधाऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख करताना त्यांनी स्वराज्यरक्षक असा उल्लेख केला आहे.
त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, म्हणजे आता सरकारने सत्य मान्य केले आहे संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आहेत. त्याबद्दल सरकारचे खरं तर अभिनंदन केले पाहिजे असा टोला त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्यरक्षक केला होता. त्यांनंतर राज्यभर वेगवेगळे पडसाद उमटले असले तरी आता सरकारने अजित पवार चुकीचे काही बोलले नाहीत, ते बरोबर होते हेच या सरकारने मान्य केले आहे असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने जर आज हे स्वराज्यरक्षक संभाजी महाराज हे मान्य करत असतील तर अजित पवार हे सत्य बोलत होते हेच त्यातून स्पष्ट होते असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य त्यांनी कशा पद्धतीने अबाधित ठेवले होते. स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांनी हे स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी आपली आघाडी उघडली असंही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले स्वराज्य हे छत्रपती संभाजी महाराज यांनी सांभाळलेही आणि त्या स्वराज्याचे तेच खरे स्वराज्यरक्षकही झाले असंही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले.