व्यासंगी आणि अभ्यासू आमदार म्हणून शिक्षक मतदारसंघाचे अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलेल्या कपिल पाटील यांनी अखेर त्यांच्या मनातील खदखद बाहेर काढली. मुंबई शिक्षक मतदारसंघात धनलक्ष्मी आणि धनदांडग्यांनी कहर केल्याचा आरोप त्यांनी यापूर्वी केला होता. आता समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी आता तूर्त आपल्या सर्वांची रजा घेतो, अशी भावनिक साद घातली आहे. त्यातच त्यांनी महाविकास आघाडीवर चांगलेच तोंडसूख घेतले आहे.
समाजवादी विचाराच्या नेत्याची उणीव
कपिल पाटील हे समाजवादी विचाराच्या नेत्यांपैकी एक आहेत. व्यासंगी आणि अभ्यासू नेता म्हणून ठसा उमटवला आहे. विधिमंडळातील त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाचे विरोधकच नाही तर सत्ताधारी पण चाहते आहेत. शिक्षणकांसाठी भांडणारा नेता म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. पण नुकत्याच झालेल्या मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीतील गैरप्रकारावर त्यांनी तोंडसूख घेतले. त्यांच्या आमदारकीची मुदत संपल्यानंतर त्यांनी निरोपाचा संदेश सर्व कार्यकर्त्यांसाठी लिहिला आहे. त्याची सध्या समाज माध्यमांवर चर्चा रंगली आहे.
तूर्तास रजा घेतो…
त्यांनी त्यांच्या ब्लॉगवर भावनांना वाट मोकळी करुन दिली. मुंबई शिक्षक मतदार संघातून ते सलग तीन वेळा निवडून आले. 18 वर्षे त्यांनी शिक्षकांचे प्रतिनिधीत्व केले. आता मुदत संपल्याने त्यांनी सर्वांची रजा घेतली. त्यावेळी त्यांच्या भावना दाटून आल्या. त्यांनी निरोपाच्या संदेशात मनातील हे कोलाहल शब्दात बद्ध केले.
इंडिया आघाडीत आपण सोबत राहिलो. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी त्यांना मतदान केलं. इंडिया आघाडीतल्या प्रमुख पक्षांची तक्रार होती की, भाजपने त्यांचे पक्ष चोरले, पळवले. पण इंडिया आघाडीतील छोट्या पक्षांशी मोठे पक्ष कसे वागले ? भाजपसारखेच ?
————
तूर्त रजा घेतो, पण कायम… pic.twitter.com/Sp4oOmjXEC
— Kapil Patil (@KapilHPatil) July 12, 2024
शिक्षकांना केला सलाम
‘चौथी निवडणूक आपण किरकोळ मतांनी हरलो असलो तरी सुभाष सावित्री किसन मोरे निवडणूक हरलेला नाही. पैसा, सत्ता आणि अपप्रकार यांचीच चर्चा या निवडणुकीत जास्त झाली. या निवडणुकीत विरोधकांकडून चुकीचे मार्ग अवलंबले गेले. त्यांच्याकडे सत्तेची प्रचंड ताकद होती. आपली साधनं अपुरी होती. तरीही आपण सारे निकराने लढलो. प्रलोभनांना भीक न घालता ठाम राहिलो.’ असे सांगत त्यांनी सर्व शिक्षकांचे, संस्थाचालकांचे आभार मानले.
इंडिया आघाडीला कानपिचक्या
‘इंडिया आघाडीत आपण सोबत राहिलो. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी त्यांना मतदान केलं. इंडिया आघाडीतल्या प्रमुख पक्षांची तक्रार होती की, भाजपने त्यांचे पक्ष चोरले, पळवले. पण इंडिया आघाडीतील छोट्या पक्षांशी मोठे पक्ष कसे वागले ? भाजपसारखेच ?’ अशा कानपिचक्या त्यांनी महाविकास आघाडीला दिल्या. महाविकास आघाडीविषयी त्यांना जाहीर नाराजी व्यक्त केली.