Video : मुंबईच्या जुहू बीचवर डांबराच्या गोळ्यांचा ढीग; किनाऱ्यावर प्लास्टीकसह कचऱ्याचा खच

| Updated on: Jul 10, 2022 | 2:03 PM

शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या जुहू बीचवर (Juhu Beach) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीचवर चक्क डांबराचे गोळे (Tar balls) पहायला मिळत आहेत. या डांबरांच्या गोळ्यांचा खच बीचवर पडला आहे.

Video : मुंबईच्या जुहू बीचवर डांबराच्या गोळ्यांचा ढीग; किनाऱ्यावर प्लास्टीकसह कचऱ्याचा खच
Follow us on

मुंबई : शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या जुहू बीचवर (Juhu Beach) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीचवर चक्क डांबराचे गोळे (Tar balls) पहायला मिळत आहेत. या डांबरांच्या गोळ्यांचा खच बीचवर पडला आहे. किनाऱ्यावर सर्वदूर हे डांबराचे गोळे पसरले आहेत. दरम्यान हे डांबराचे गोळे म्हणजे कच्च्या तेलाच्या (Crude oil) गळतीमुळे निर्माण झाले असावेत असा अंदाज तज्ज्ञांनी बांधला आहे. या किनाऱ्यावर केवळ डांबराचे गोळेच नव्हे तर मोठ्याप्रमाणात प्लास्टीक आणि कचरा देखील पसरला आहे. मुंबईत गेल्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाच्या पाण्याबरोबर वाहून हा कचरा समुद्र किनाऱ्यावर आला आहे. असे डांबराचे गोळे अनेकदा समुद्र किनाऱ्यावर दिसतात असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या डांबरांच्या गोळ्यामुळे केवळ बीचचे सौंदर्यच नष्ट होत नाही तर त्यामुळे खेकडे आणि इतर उभयचर प्राण्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण होतो. त्यांच्या प्रजननात अडथळा निर्माण होतो असं तज्त्रांचं म्हणण आहे.

मुसळधार पावसाचा इशारा

हवामान खात्याकडून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकणातील जवळपास सर्वच जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर राज्यातील इतर भागात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस होईल असे हवामान विभागाने म्हटले आहे. राज्यात अद्यापही पावसाने उघडीप दिलेली नाही. राज्याच्या अनेक भागात पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला असून, पीके पाण्याखाली गेली आहेत. शेतात पाणी साचले आहे. अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी शाळा मंदीरे देखील पाण्याखाली गेल्याचे पहायला मिळत आहेत. दरम्यान बचाव कार्य सुरू असून, त्याचा आढावा खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

 

आतापर्यंत 67 जणांचा मृत्यू

राज्यात पावसाने हाहाकार उडवला आहे. जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. तसेच धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणाची पाणीपातळी देखील वाढली आहे. धरणाच्या पाणीपातलीत वाढ झाल्याने धरणाचे पाणी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीव एनडीआरएफचे 15 पथक तैनात करण्यात आले आहेत. पावसामुळे घडलेल्या दुर्घटनेत एक जुलैपासून ते आतापर्यंत 67 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. पुढील काही दिवस पाऊस कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.