मुंबईः हे घटनाबाह्य सरकार काही दिवसांसाठी असून ते येत्या काही दिवसातच कोसळणार असल्याची शक्यता ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी चाळीस आमदारांचा मुंबई-सूरत-गुवाहाटी-गोवा आणि मुंबई असा प्रवास करणाऱ्या आमदारांवर गद्दारीचा शिक्का मारत त्यांनी त्यांच्यावर गद्दार हाच शिक्का त्यांच्यावर मारला. यावेळी 40 आमदारांवर टीका करताना त्यांनी 50 खोके एकदम ओके ही गोष्ट भारतातच नाही तर जगभरात यांची ही गद्दारी पोहचली असल्याचेही त्यांनी म्हटले.
शिंदे-फडणवीस सरकारमुळे राज्यातील प्रकल्प गुजरातला गेल्यामुळेही त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शिंदे-फडणवीस सरकारमुळे राज्यातील प्रकल्प बाहेर गेल्यामुळे राज्यातील रोजगार निघून गेला आहे. त्यामुळे राज्याचे प्रचंड नुकसान झाले असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
सध्या राज्यातील परिस्थिती चांगली नाही. एकीकडे अनेक प्रकल्प दुसऱ्या राज्यात निघून जात आहेत. तर दुसरीकडे प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या बदलांचेही राजकारण चालू करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने विकासाला खीळ बसली आहे.
महाविकास आघाडी सरकार असताना ज्या योजना आणि प्रकल्प राबवण्यात आले, ते प्रकल्प आता थांबवले गेले आहेत. त्यामुळे राज्याचा विकास होणार कसा असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
आमदार आदित्य ठाकरे यांनी चाळीस आमदारांवर टीका करताना शिंदे गटातील प्रत्येक आमदाराचे नाव गद्दार असल्याचे सांगत. यावेळी त्यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधत सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केल्या प्रकरणी त्यांच्यावर जोरदार टीका केली.
आदित्य ठाकरे यांनी यावेळी खासदार संजय राऊत यांना झालेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे सांगितली. त्यांनी यावेळी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दलही त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला.