मुंबईः राज्यातील शिवसेनेच्या चिन्ह आणि पक्षाचा वाद न्यायालयात गेल्यानंतर राजकारण अधिकच ढवळून निघाले आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तर दुसरीकडे राज्यकर्त्यांच्या विरोधी गटाची एसीबी, ईडीकडून चौकशी लावण्यात येत असल्याने हे राजकारण अधिकच तापले आहे. त्यातच नुकताच ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची एसीबीकडून चौकशी लावण्यात आल्याने ठाकरे गट अधिक आक्रमक होत शिवसेनेवर व भाजपवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.
आमदार राजन साळवी यांची एसीबी कार्यालयाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. एसीबीकडून ही चौकशी करण्यात आली असली तरी त्या अधिकाऱ्यांना जी माहिती पाहिजे होती.
ती मी अधिकाऱ्यांना दिली असल्याचेही राजन साळवी यांनी सांगितली आहे. त्याच बरोबर एसीबीला आणखी काही माहिती हवी असेल तर तीही माहिती मी देणार असल्याचे राजन साळवी यांनी सांगितले.
आमदार राजन साळवी यांनी सांगितले की, एसीबीकडून मला बोलवून जी माहिती त्यांनी विचारली आहे. त्याची इत्थंभूत माहिती मी त्यांना दिली आहे. माझ्या संपत्तीविषयीही त्यांनी चौकशी केली आहे.
तीही माहिती मी त्यांना मी दिली असल्याचे राजन साळवी यांनी माहिती दिली आहे. आता ज्या प्रमाणे त्यांनी मला माहिती विचारली आहे. ती माहिती तर मी दिली आहेच मात्र पुढील आठवड्यातही मला चौकशीला बोलवलं असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या प्रकारे ठाकरे गटाच्या नेत्यांना हा त्रास दिला जात आहे. तोचुकीचा आहे. मात्र या प्रकारचा कितीही त्रास दिला असला , कितीही चौकशी लागली तरी मी ठाकरेंसोबतच राहणार आहे असा ठामपणे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.
न्यायालयाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले असले तरी महाराष्ट्राची खरी शिवसेना ही मातोश्रीवरून चालते असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवले.
एसीबीकडून कोणत्याही आणि कशाही प्रकारची चौकशी लावली तरी मी मरेपर्यंत ठाकरे सोबतच राहणार आहे दुसरीकडे कुठेही जाणार नाही असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.