“आज जनता तुमच्याबरोबर विकली गेलेली नाही”; ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांना विकाऊ ठरवलं…

| Updated on: Feb 27, 2023 | 11:55 PM

खासदार राजन विचारे यांनी शिवसेनेचा इतिहास आणि त्यासाठी लोकांनी आपल्या आयुष्याची कशी वाताहात करून घेतली त्या गोष्टींचीही आठवण त्यांनी शिवसेनेतील नेत्यांना करून दिली आहे.

आज जनता तुमच्याबरोबर विकली गेलेली नाही;  ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांना विकाऊ ठरवलं...
Follow us on

मुंबईः महाविकास आघाडीच्या सरकारमधून बंडखोरी करून मुंबई-सुरत-गुवाहटी-गोवा आणि पुन्हा मुंबई असा प्रवास करणाऱ्या शिवसेनेच्या शिंदे गटावर ठाकरे गटाच्या खासदार राजन विचारे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्या शिवसेनेने रक्ताचे पाणी करून शिवसेना वाढवली, सामान्यातील सामान्य माणसाला ज्या शिवसेनेने लोकांना नेते केले. तिच माणसं आज शिवसेना संपवल्या निघाली आहेत असा घणाघातही राजन विचारे यांनी शिवसेनेवर केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जे गद्दार आमदार आज आमदार, खासदार आणि मंत्री झाले आहेत. त्यांच्याकडून शिवसेना आणि शिवसेनेच्या राज्यातील गावागावात असणाऱ्या शाखा संपवल्या जात आहेत अशी टीकाही राजन विचारे यांनी केली आहे.

आज जरी तुम्ही शिवसेना पक्ष, चिन्ह आणि एखाद्याचा बाप चोरला असला तरी ही जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही असा इशाराही राजन विचारे यांनी दिला आहे.

जे गद्दार आमदार विकले गेले आहेत.त्यांच्याप्रमाणे तरी राज्यातील जनता ही विकली गेली नसल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

खासदार राजन विचारे यांनी शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले की, आज जरी एकनाथ शिंदे यांना हे चिन्ह आणि पक्ष मिळाला असला तरी राज्यातील जनता तुमच्या सोबत कुणाबरोबरच नाही हे ही त्यांनी लक्षात घ्यावे.

कारण आता लोकं फक्त एकाच गोष्टीची वाट बघत आहेत, ती म्हणजे निवडणुकीची. त्यामुळे निवडणुका लागल्या की तुमची जागा ही जनताच तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असंही ठणकावून सांगण्यात आले आहे.

खासदार राजन विचारे यांनी शिवसेनेचा इतिहास आणि त्यासाठी लोकांनी आपल्या आयुष्याची कशी वाताहात करून घेतली त्या गोष्टींचीही आठवण त्यांनी शिवसेनेतील नेत्यांना करून दिली आहे.

यावेळी सांगताना ते म्हणाले की, काही शिवसैनिकांनी शाखा बांधण्याच्या नादात, शिवसेना उभी करण्याच्या नादात अनेक शिवसैनिकांनी आपले स्वतःचे घरही बांधले नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.