दक्षिण मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत दक्षिण मुंबईमधून निवडून आले. मात्र ठाकरेंचे आमदार असेलेल्या मतदारसंघात अपेक्षित आघाडी मिळाली नसल्याचं चित्र आहे. वरळीचे आमदार असलेले आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातून अरविंद सावंत यांना अपेक्षित अशी लीड मिळाली नाही. ठाकरे गटाचे वरळीमध्ये विधानपरिषदेचे दोन आमदार आहेत तरी देखील अरविंद सावंत यांना अपेक्षित लीड मिळाली नाही. तर दुसरीकडे शिवडी विधानसभेत लालबाग, परेल ठाकरे गटाचा बालेकिल्ला असताना देखील केवळ 17 हजार 48 मतांची लीड मिळाली.
अरविंद सावंत यांना सर्वाधिक लीड ही शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्याव भायखळा मतदारसंघ आणि काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांच्या मतदारसंघातून मिळाली आहे. अरविंद सावंत यांना भायखळा विधानसभेतून 46 हजारांची लीड तर अमीन पटेल यांच्या मुंबादेवी मतदारसंघातून 37 हजार 799 मतांची लीड मिळाली आहे. बालेकिल्यात ठाकरे गटाला अपेक्षित मतदान मिळत नसल्याने ठाकरे गटाला चिंतन करण्याची गरज आहे.
अरविंद सावंत -64 हजार 844
यामिनी जाधव – 58 हजार 129
अरविंद सावंत आघाडी – 6 हजार 715
अरविंद सावंत – 77 हजार 344
यामिनी जाधव – 60 हजार 296
अरविंद सावंत आघाडी – 17 हजार 48
अरविंद सावंत – 86 हजार 883
यामिनी जाधव – 40 हजार 817
अरविंद सावंत आघाडी – 46 हजार 66 मतांनी आघाडीवर
अरविंद सावंत – 39 हजार 573
यामिनी जाधव – 87 हजार 860
यामिनी जाधव आघाडी – 48 हजार 287 मतांनी आघाडीवर
अरविंद सावंत – 74 हजार 469
यामिनी जाधव – 36 हजार 690
अरविंद सावंत आघाडी – 37 हजार 799
अरविंद सावंत – 47 हजार 684
यामिनी जाधव – 56 हजार 778
यामिनी जाधव आघाडी – 9 हजार 94 मतांनी आघाडीवर
अरविंद सावंत पोस्टल मतदान मिळून 53 हजार 384 मतांनी विजयी