“चिन्हं कोणतंही मिळो, आपलं चिन्हं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे”; या नेत्यानं एकनाथ शिंदे यांना ठणकावून सांगितलं

| Updated on: Feb 26, 2023 | 4:37 PM

निवडणूक आयोगाचा निकाल हा कोणत्यातरी पक्षाच्या कार्यालयातून लिहून आला होता असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

चिन्हं कोणतंही मिळो, आपलं चिन्हं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे; या नेत्यानं एकनाथ शिंदे यांना ठणकावून सांगितलं
Follow us on

मुंबईः ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह गेलं त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी देवऱ्हात असलेला धनुष्यबाण आणून जनतेला आणून दाखवला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना काय यातना झाल्या असतील याचा विचार करा असं भास्करराव जाधव यांनी बोलताना सांगितले. आधी मी नरेंद्र मोदींचाच माणूस, त्यानंतर अमित शाह हे माझ्या वडिलांसारखे आहेत असं म्हणणाऱ्यांनीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचेच वडिल पळवल्याचा ठपका ठेवत भास्करारव जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शिवगर्जना अभिनायनांतर्गत बोलताना त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली.

यावेळी बोलताना ठाकरे गटाचे नेते भास्करराव जाधव यांनी शिवसेना ही उद्धव ठाकरे गटाचीच कशी आहे तेही त्यांनी ठणकावून सांगितले. ठाकरे म्हणजे मातोश्री, ठाकरे म्हणजे धनुष्यबाण आणि ठाकरे म्हणजेच शिवसेना असंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

YouTube video player

ज्या पद्धतीने महाप्रबोधन यात्रेला सुरुवात ठाण्यातून झाली होती, त्या प्रमाणे शिवगर्जना यात्रेलादेखील इथूनच सुरवात झाली आहे. त्यामुळे शिवसेनेला या ठाणे शहरानेच यश दिले आहे.

ठाणे शहर नेहमीच सर्व राजकीय घडामोडींचे साक्षीदारही राहिले आहे असा विश्वासही भास्करराव जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.

ज्या दिवशी शिवसेनेच चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला तो दिवस खरं तर देशात अघटीत घटना घडल्यासारखा आहे. 18 तारखेला शिवसेना मूळ पक्षाचे नाव आणि चिन्ह हे गद्दराना देण्यात आले.

या देशाच्या 75 वर्षाच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदा घडली आहे. यावेळीही त्यांनी शिवसेना म्हणजे ठाकरे, धनुष्यबाण म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे मातोश्री ठाकरे म्हणजे धनुष्यबाण आणि शिवसेना असंही शिंदे यांना ठणकावून सांगण्यात आले.

आमदारा भास्करराव जाधव यांनी पक्षाचं राजकारण सांगताना म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार हेही ज्या वेळी काँग्रेसमधून बाहेर पडले.

त्यावेळी त्यांनीही मूळ पक्षाच्या चिन्हावर कधीच दावा सांगितला नाही. मात्र एकनाथ शिंदे यांनी सगळ्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांना दुःख पोहचवून त्यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला असा टोलाही त्यानी त्यांना लगावला आहे.

ज्यादिवशी शिवसेना पक्ष आणि धनु्ष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले मात्र या निर्णयाची सगळी स्क्रीप्ट आणि निवडणूक आयोगाचा निकाल हा कोणत्यातरी पक्षाच्या कार्यालयातून लिहून आला होता असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

1988 साली शिवसेना पक्षाला धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले तेव्हापासून शिवसेनाप्रमुखांनी धनुष्यबाण देवाप्रमाणे पुजला त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही धनुष्याबाण पुजला तेच धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाल्यानंतर ठाकरे कुटुंबीयांना काय यातना झाल्या असतील असंही त्यांनी भावूकपणे सांगितले. त्यामुळे आता खचयाचं नाही तर आता निष्ठेने लढायच असा विश्वासही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

त्यामुळे चिन्हं कोणतंही मिळो, आपलं चिन्हं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा विश्वास देत भास्करराव जाधव यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ठणकावूनही सांगितले.