मुंबई : मागील दोन दिवसांपासून शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे शिवसेना आणि ठाकरे गट आमनेसामने आले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून मुंबईतील राजकारण ढवळून निघाल्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शीतल म्हात्रे यांच्या या व्हिडीओप्रकरणी ठाकरे गटातील काहीजणांवर पोलीस गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता ठाकरे गट आक्रमक होत आता शीतल म्हात्रे यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटातील काहीजणांविरोधात गुन्हा दाखल केल्याने शीतल म्हात्रे यांच्या विरोधात दहिसर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे.
यासाठी ठाकरे गटाचे विनोद घोसाळकर, आमदार विलास पोतनीस, संजना घाडी यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका दहिसर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा मॉर्फ केलेला व्हिडीओ ठाकरे गटातील काही जणांनी व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रे आणि शिवसेनेने केलेले आहे.
त्यामुळे आता या प्रकरणी ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. या प्रकरणी ठाकरे गटातील काही जणांवर चुकीचे आरोप ठेऊन गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा पलटवार ठाकरे गटाने केला आहे.
त्यामुळे याप्रकरणी विलास पोतनीस यांनी सांगितले की, व्हिडीओ प्रकरणी चुकीचा आरोप करण्यात आला आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी केलेल्या अश्लिल कृत्यावर गुन्हा दाखल करण्याची मगाणी अशी मागणी आम्ही पोलिसांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी सांगितले की, शीतल म्हात्रे यांच्यावर आम्ही काहीही आरोप केलेले नाहीत मात्र मुद्दा असा आहे की व्हायरल झालेला हा व्हिडीओ आमदार प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव यांनी व्हायरल केला आहे. त्यांनी तो व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर आता तो व्हिडीओ अनेकांनी पाहिला असल्याचेही ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे.
शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा जो कालचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतरही आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा तो व्हिडिओ समोर आला आहे.
ज्यामध्ये प्रकाश सुर्वे शीतल म्हात्रे यांच्या कंबरेवर हात ठेवून बोलत आहेत. हे सार्वजनिक ठिकाण केले जात आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणे हा आपल्या देशात गुन्हा आहे. त्यामुळे अश्लील कृत्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.