ठाकरे गटाच्या लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी आज होणार जाहीर , कोणाला मिळणार संधी ?

| Updated on: Mar 26, 2024 | 8:58 AM

लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यात आलं आहे. लोकसभेसाठी एकीकडे भाजप आणि काँग्रेसच्या एकामागोमाग एक उमेदवार यादी जाहीर होत असताना ठाकरे गटाकूडून अजून एकही उमेदवार झालेला नाही. मात्र आज शिवसेना ठाकरे गटाकडून आज लोकसभेची पहिली उमेदवारी यादी जाहीर होणार आहे.

ठाकरे गटाच्या लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी आज होणार जाहीर , कोणाला मिळणार संधी ?
uddhav thackeray
Follow us on

लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यात आलं आहे. लोकसभेसाठी एकीकडे भाजप आणि काँग्रेसच्या एकामागोमाग एक उमेदवार यादी जाहीर होत असताना ठाकरे गटाकूडून अजून एकही उमेदवार झालेला नाही. मात्र आज शिवसेना ठाकरे गटाकडून आज लोकसभेची पहिली उमेदवारी यादी जाहीर होणार आहे. ठाकरे गटाकडून 15 ते 16 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात येतील. कालच संजय राऊत यांनी यासंदर्भातील माहिती दिली होती. तर दुसरीकडे शिंदे गटसुद्धा आज उमेदवारी यादी जाहीर करणार असल्याचं संजय मंडलिक यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेसाठी कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्वाचं ठरेल.

ठाकरे गटाकडून कोणाला संधी ?

महाविकास आघाडीमधील जागावाटप कधीपर्यंत होणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगते आहे. यासंदर्भात अनेक बैठका झाल्या आहेत. काँग्रेसने यापूर्वी काही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाची आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची यादी अद्याप जाहीर होणे बाकी आहे. शिवसेना ठाकरे गटाची यादी आज संध्याकाळापर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज संध्याकाळपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदावारांची नाव जाहीर केली जाऊ शकतात.

भाजपच्या पराभवासाठी आखली रणनिती

शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली. त्यादरम्यान लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव कसा करायचा यासाठी रणनिती आखण्यात आली.
शिवाय कालच्या बैठकीत उमेदवारांच्या नावासंदर्भात आणि जागावाटपसंदर्भात २ तास विस्तृत चर्चादेखील झाली.

राज्यात महाविकास आघाडीमध्ये एकजूट राहावी आणि जागावाटप पूर्ण झाल्यानंतर विविध आघाड्यांवर निवडणुकीसाठी व्यूहरचना आखण्यात यावी याबाबत ठाकरे आणि पवारांमध्ये विस्तृत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात भाजप विरोधात काय रणनीती असावी याबद्दल, तसेच राज्यात लोकसभेसाठी संयुक्त प्रचाराचा धडाका सुरू करण्याचे नियोजन सुद्धा या बैठकीत झाल्याचं कळत आहे.