ठाणे : शिवसेनेतील (Shivsena) बंडानंतर स्वत:चा गट खरी शिवसेना असल्याचे सिद्ध करण्यासाठी दोन्ही गटाकडून दावे केला जात आहेत. असली नकलीचा दाव्यावर सर्वोच्च न्यायलय व निवडणूक आयोगातही सुनावणी सुरु आहे. स्थानिक पातळीवर संघर्ष दिसतो. कार्यालयांवर प्रत्येक गटा आपलाच दावा करत आहे. ठाणे शहरातील शिंदे सेनेचे मुख्यालय असलेले आनंद आश्रम (Anand Ashram) चे नाव बदलण्यात आले आहे. आनंद दिघे यांच्या जयंती दिनी कार्यालयाला नवे नाव दिले आहे.
उद्धव ठाकरे गुरुवारी ठाणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला हार घातला. जैन समाजाचा कार्यक्रम हजेरी लावली. आरोग्य शिबिरात गेले. पण धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आनंद आश्रममध्ये गेले नाही.
सत्ता संघर्षानंतर शिंदे गटाकडून ठाण्यातील आनंद आश्रम नाव बदले आहे. बाळासाहेबांची शिवसेना आनंद आश्रम, एकनाथ शिंदे असं आनंद आश्रमला नाव देण्यात आलेल आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचं कार्यालय या ठिकाणी आहे. ठाणे शहर किंवा इतर ठिकाणांवरून अनेक जण आपले प्रश्न, समस्या व कामे घेऊन या ठिकाणी येतात.
मंत्रालयासमोर कार्यालय
मुंबई मंत्रालयसमोर बाळासाहेब भवन कार्यालय उघडण्यात आले आहे. यामुळे शिंदे गटाचे कामकाज त्या ठिकाणी देखील होत आहे. आनंद आश्रम याला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिल्यामुळे एकच चर्चेचा विषय बनला आहे. याच आनंद आश्रममध्ये आनंद दिघे यांनी शिवसेना मोठी केली. त्यांच्याच तालमीत तयार झालेले एकनाथ शिंदे आज राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत.
येत्या काळात मोठ्या प्रमाणात सत्ता संघर्ष पाहायला मिळणार आहे. आनंद आश्रमचे नाव बदलून बाळासाहेबांची शिवसेना केल्यामुळे सर्वच कारभार असो वा पक्षप्रवेश याच कार्यालयातून होणार आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आनंद आश्रममध्ये आनंद दिघे यांच्या फोटोला फुलांनी सजवण्यात आलेले आहे.
जून महिन्यात घेतला ताबा
आनंद आश्रमचा ताबा शिंदे समर्थकांनी घेतला होतो. २९ जून २०२२ रोजी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यावर शिवसेनेकडून हकालपट्टीची कारवाई झाली होती. त्यानंतर महिला पदाधिकाऱ्यांनादेखील याच आनंद आश्रमजवळ शक्ती प्रदर्शन केले. त्यानंतर शिंदे समर्थकांनी आनंद आश्रमचा ताबा घेतला. त्यावेळी ठाकरे समर्थकांकडून कोणताही विरोध झाला नव्हता.