ठाणे : पोलीस म्हणजे रागीट, कणखर व्यक्ती, असे सगळ्यांनाच वाटते (Thane Police Celebrates Birthday Of Boy). त्यामुळे साहजिकच सामान्य माणसांना पोलिसांची भीती वाटते. परंतु पोलीसदेखील माणूसच असून ठाण्यात पोलिसातील माणुसकीचे दर्शन झाले. ठाण्यात एका 7 वर्षीय मुलाचे आई-वडील कोरोनामुळे रुग्णालयात होते. त्यामुळे ठाण्यातील डायघर पोलिसांनी त्या मुलाच्या घरी जाऊन त्याचा वाढदिवस साजरा केला. हे दृश्य पाहून उपस्थित सर्वांनाच अश्रू अनावर झाले (Thane Police Celebrates Birthday Of Boy).
द्रीश गुप्ता हा 7 वर्षीय मुलगा वडील दिनेश आणि आई सोबत निर्मल नगरी, खर्डीपाडा येथे राहतो. काही दिवसांपूर्वी दिनेश गुप्ता आणि त्यांच्या पत्नींना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांना वाशी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. लहानगा द्रिश आपली आजी आणि इतर लहान भावंडांसह घरी राहिला.
15 सप्टेंबर रोजी द्रीशचा वाढदिवस असल्याने तो आपण साजरा करु शकत नाही, याचे अतीव दुःख गुप्ता दाम्पत्याला झाले. आपल्या मुलाचा वाढदिवस कोणत्याही परिस्थितीत करायचाच या इराद्याने त्यांनी 15 सप्टेंबरच्या रात्री जवळपास 11.15 वाजता ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या ट्विटरवर ट्वीट करुन द्रिश याचा वाढदिवस साजरा करावा, अशी विनंती केली (Thane Police Celebrates Birthday Of Boy).
वरिष्ठांचे आदेश मिळताच शीळ डायघर पोलीस ठाण्याचे वरीष्ट पोलीस निरिक्षक चंद्रकांत जाधव, सहाय्यक पोलीस निरिक्षक ब्रिजेश शिंदे, विशाल चिटणीस, कृपाली बोरसे, पोलीस उपनिरिक्षक सुजाता पाटील, पोलीस नाईक प्रदीप कांबळे आणि इतर कर्मचाऱ्यांनी खर्डीपाडा येथील गुप्ता यांचे घर गाठलं आणि द्रीशचा वाढदिवस साजरा करुन त्याला शुभेच्छा दिल्या.
दिनेश यांची मुलं खूप लहान असून ते दोघेही कोरोना बाधित झाल्याने या मुलांचा सांभाळ सध्या त्यांची आजी करीत आहे. परंतू वाढदिवसाला नेमके आई-वडील त्यांच्याजवळ नाहीत, अशा वेळी पोलिसांनी येऊन त्यांचे पालकत्व निभावल्याने अतिशय आनंद झाल्याची भावना सोसायटीतील नागरिकांनी व्यक्त केली.
धावत्या गॅस टॅंकरमध्ये चालक बेशुद्ध, जिगरबाज पोलिसाने शिताफीने टॅंकर थांबवला, सोलापुरात थरार https://t.co/EVP0lPRMyT #SanjayChaugule #Solapur #GasTanker
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 12, 2020
Thane Police Celebrates Birthday Of Boy
संबंधित बातम्या :
महेश सुतार : वाशी खाडीत आत्महत्या करणाऱ्यांना जीवनदान देणारा देवदूत
जितेंद्र आव्हाडांकडून ठाण्यातील पोलीस वसाहतींचा प्रश्न निकाली, पोलिसांना 567 घरं मिळणार