मी शरद पवार यांच्याशी खोटं बोललो, छगन भुजबळ यांची Tv9 मराठीच्या मुलाखतीत कबुली, नेमका किस्सा काय?

| Updated on: Oct 11, 2023 | 7:37 PM

Chagan Bhujbal | Tv9 मराठीच्या मुलाखतीत छगन भुजबळ यांनी मोठे गौप्यस्फोट केले. 2 जुलै रोजी काय घटनाक्रम घडला. गोटातील घडामोडींची सविस्तर माहिती त्यांनी दिली. महायुती सरकारमध्ये शपथविधी उरकला. त्यादिवशी नेमकं काय घडलं. शरद पवार यांच्याशी खोटं बोलल्याची कबुली त्यांनी दिली.

मी शरद पवार यांच्याशी खोटं बोललो, छगन भुजबळ यांची Tv9 मराठीच्या मुलाखतीत कबुली, नेमका किस्सा काय?
Follow us on

मुंबई | 11 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) उभी फूट हा राज्यातील आजही चर्चेचा विषय आहे. राष्ट्रवादी पक्षात अनेक दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत होत्या. अगोदर अध्यक्ष पदाचे नाट्य रंगले. शरद पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली. देशभरात त्याची चर्चा झाली. त्यानंतर मनधरणी करण्यात आली. शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला. पण राष्ट्रवादीत खदखद दिसत होती. पक्षातंर्गत अनेक घडामोडी, मतप्रवाह सुरु होते. त्याची चुणूक 2 जुलै रोजी दिसली. अजित पवार यांच्या नेतृत्वातील गट महायुतीत सहभागी झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार गोटाने घरोबा केला. त्यावेळी छगन भुजबळ यांच्या भुमिकेकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. Tv9 मराठीच्या मुलाखतीत छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी याविषयीचे मोठे गौप्यस्फोट केले. शरद पवार यांच्याशी खोटं बोलल्याची कुबली त्यांनी यावेळी दिली.

तिकडे काय होते ते बघून येतो

यावेळी छगन भुजबळ यांच्यावर शरद पवार यांनी केलेली टीका गाजली होती. शपथविधीच्या घडामोडी घडत असताना छगन भुजबळ यांचा फोन आला. तिकडे काय होतंय, ते बघून येतो असे ते म्हणाले. पण थोड्याच वेळात छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याचे समजल्याचे समजल्याचे पवार म्हणाले होते. त्यावर छगन भुजबळ यांनी मन मोकळं केलं. 2 जुलै रोजी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी खोटं बोलल्याची कुबली छगन भुजबळ यांनी Tv9 मराठीच्या मुलाखतीत दिली.

हे सुद्धा वाचा

भाजपसोबत जाण्याचे अगोदरच ठरले होते

या मुलाखतीत भाजपसोबत जाण्याचे अगोदरच ठरले होते. अध्यक्ष बदलण्याच्या घडामोडी सुरु होत्या. सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याची चर्चा झाली. त्यानंतर भाजपसोबत जाण्याचे ठरले. किती मंत्रीपद मिळतील. कोण मंत्री होईल, हे सर्व ठरलं. प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील आणि अजित पवार हे पक्षाची बाजू मांडतील, हे पण ठरलं होतं. पाठिंबा देण्याचे आश्वासन दिल्या गेलं. हे बंड नसुन अजित पवार यांनी दिलेला शब्द पाळला. वेगळा गट करुन भाजपमध्ये जाण्यापूर्वीचा घटनाक्रम छगन भुजबळ यांनी मुलाखतीत उलगडला.