मुंबईः राज्यात सहा महिन्यापूर्वी महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत शिंदे गटाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पायउतार केले होते. त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरण बदलत गेली आहेत. त्यामुळेच उद्या होणाऱ्या नव्या युतीची चर्चा आता जोरदार पणे होऊ लागली आहे. महाराष्ट्रात उद्या शिवशक्ती-भीमशक्ती अशा युतीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत मग राजकीय चित्र काय असेल असा सवालही उपस्थित केला जात आहे.
शिवशक्ती-भीमशक्तीबद्दल शक्यता आणि भाकीतं वर्तवली जात असली तरी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मात्र आपल्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आता फक्त ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून ते जाहीर करायचे बाकी आहे असं त्यांनी या युतीविषयी बोलताना स्पष्टच सांगितले आहे. त्यामुळे शिवक्ती आणि भीमशक्ती आता एक होणार असल्याची शक्यताही दाट आहे.
शिवशक्ती आणि भीमशक्ती या युतीबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी आपले मत सांगताना स्पष्टच सांगितले आहे की, ठाकरे गटाचे जे मित्र पक्ष असतील त्यांचा आम्हाला कोणताच त्रास असणार नाही.
काँग्रेस असले तरी काही अडचणी नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस असली तरीही आम्हाला काही अडचण नाही पण त्यांनी एकदा आपली बाजू स्पष्ट करावी असंही त्यांनी सांगितले आहे.
या युतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दुग्ध शर्कराचा योग म्हटले आहे तर भाजपच्या नेत्यानी मात्र जुना इतिहास सांगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर काँग्रेसने कसा अन्याय केला होता याची प्रकाश आंबेडकर यांनी आठवण करून दिली आहे.
आगामी काळात निवडणुका होतील त्यावेळी शिवशक्ती-भीमशक्तीची राजकीय समीकरणं काय असतील यावरही चर्चा केली जात आहे. पुणे, परभणी, सांगली, सोलापूर, अकोला, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आले नाहीत.
तरीही त्यावेळी त्यांनी काटे की टक्कर दिली होती हे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे आता जर ही आघाडी झाली तर मात्र राज्यातील राजकारण वेगळ्या टप्प्यावर पोहचणार असल्याचे दिसून येत आहे.